मनमाड :- इ.10 वी परीक्षा मार्च/एप्रिल 2024 मध्ये प्रविष्ट झालेल्या एच.ए.के. हायस्कूल मनमाड विदयार्थ्यांचा निकाल 96.20 टक्के उत्कृष्ट लागला असून उज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे.
उर्दू माध्यमातून प्रविष्ट झालेले 60 पैकी 57 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. प्रथम -शेख नौशीन मुश्ताक 81.20 %, द्वितीय -अन्सारी अलीना परवीन मो. खालिद -80.60%, तृतीय – शेख तझीन फैयाज-80.00% यांनी प्रथम तीन क्रमांक मिळविले.
मराठी माध्यमातून 99 विदयार्थ्यांपैकी 96 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. प्रथम- शेख साहिल जावीद -75.60%, द्वितीय-पठाण शोएब अशफाक -74.00 %,तृतीय – शाह तायबा खालिद – 73.00% यांनी प्रथम तीन क्रमांक मिळवले.
संस्थेचे अध्यक्ष मो.सलीम अहमद गाजीयानी, सचिव सायराबानो सलीम अहमद, सदस्य आयशा सलीम गाजीयानी, सादीक पठाण, मुख्याध्यापक भुषण शेवाळे, पर्यवेक्षक शाहीद अन्सारी, आरीफ शेख यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.