Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

मनमाड शहर पोलीस ठाणे तर्फे जाहीर आवाहन

Jun 3, 2024

मनमाड शहर पोलीस ठाणे जिल्हा नाशिक ग्रामीण हद्दीतील सुजाण नागरिकांना याद्वारे मनमाड शहर पोलीस ठाण्याचे वतीने जाहीर आवाहन करण्यात येते की, नाशिक लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने दिनांक 10/3/2024 पासून ते दिनांक 6/6/2024 पावेतो आदर्श आचारसंहिता अमलात असून नाशिकसह संपूर्ण देशभरात लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 चा निकाल मंगळवारी दिनांक 4/6/2024 रोजी जाहीर होणार असून त्याअनुषंगाने आपणास कळविण्यात येते की, कोणीही नागरिक सदर निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर सोशल मीडियाद्वारे फेसबुक, इंस्टाग्राम, व्हाट्सअप ग्रुप व इतर तत्सम एप्लीकेशनच्या माध्यमाद्वारे कोणत्याही समाजाच्या, जातीच्या, धर्माच्या भावना दुखावतील अशा स्वरूपाच्या पोस्ट, कॉमेंट्स, स्टोरी, स्टेटस, डिजिटल बॅनर असे प्रकार वरील माध्यमांद्वारे करू नयेत. तसेच कोणाचेही विरोधात घोषणाबाजी करू नये. डीजे वाजवणार नाहीत. फटाके फोडणार नाहीत. तसेच विनापरवाना विजयी मिरवणूक काढू नये. व्हाट्सअप ग्रुपचे ॲडमिन यांनी दिनांक 3/6/2024 ते दिनांक 6/6/2024 या कालावधीमध्ये त्यांच्या ग्रुपच्या सेटिंगमध्ये Only admin करून बदल करून घ्यावा, जेणेकरून ग्रुपमधील कोणताही सदस्य वादग्रस्त पोस्ट ग्रुपवर टाकणार नाहीत. जर एडमिन यांनी सेटिंग मध्ये बदल केला नाही व कोणी सदस्याने वादग्रस्त पोस्ट टाकल्याने काही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास पोस्ट करणाऱ्या सदस्यासह सर्व ग्रुप ॲडमिनला जबाबदार धरून त्यांचेविरुद्ध योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी.

अशोक नाना घुगे
पोलीस निरीक्षक
मनमाड शहर पोलीस स्टेशन

अजून बातम्या वाचा..

अंडरपास दुरुस्तीसाठी बंद झाल्याने होणाऱ्या वाहतूक कोंडीबाबत उपाययोजना करावी – संतोष गुप्ता

अंडरपास दुरुस्तीसाठी बंद झाल्याने होणाऱ्या वाहतूक कोंडीबाबत उपाययोजना करावी – संतोष गुप्ता

रेल्वे प्रशासनाने कुठल्याही प्रकारची पूर्वसूचना न देता नांदगाव शहरातील रेल्वे अंडरपास मध्ये...

read more
रोजगार महाकुंभ’ भव्य रोजगार मेळावा उत्साहात संपन्न. ११ कंपन्यांचा सहभाग; 236 पेक्षा जास्त युवकांचे रजिस्ट्रेशन आणि जवळपास 162 युवकांची अंतरिम निवड

रोजगार महाकुंभ’ भव्य रोजगार मेळावा उत्साहात संपन्न. ११ कंपन्यांचा सहभाग; 236 पेक्षा जास्त युवकांचे रजिस्ट्रेशन आणि जवळपास 162 युवकांची अंतरिम निवड

नाशिकच्या कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला,...

read more
चांदवड तालुक्याचा ट्रिगर-1 मध्ये समावेश करावा – आमदार आहेर यांची मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांकडे मागणी

चांदवड तालुक्याचा ट्रिगर-1 मध्ये समावेश करावा – आमदार आहेर यांची मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांकडे मागणी

राज्यातील २६८ तालुक्यांमध्ये खरीप हंगामासाठी ‘ट्रिगर-१’ लागू करून दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर...

read more
मनमाड चे आराध्य दैवत श्री निलमणी गणेशाच्या पार्थिव मूर्तीच्या पालखी  विसर्जन मिरवणुकीत व्यसन मुक्तीचा सामाजिक संदेश

मनमाड चे आराध्य दैवत श्री निलमणी गणेशाच्या पार्थिव मूर्तीच्या पालखी विसर्जन मिरवणुकीत व्यसन मुक्तीचा सामाजिक संदेश

    मनमाड - मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणारा व सार्वजनिक गणेश उत्सवातील प्रथम मानाचा...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]