loader image

मनमाड महाविद्यालयात विद्यार्थी आणि पालक यांच्यासाठी स्कूल कनेक्ट (NEP -2020 Connect) कार्यशाळा संपन्न

Jun 20, 2024


 

मनमाड – आधुनिक काळा बरोबर शिक्षण व्यवस्था ही बदलली पाहिजे कौशल्यपूर्ण शिक्षण आणि उत्तम शैक्षणिक दर्जा होण्यासाठी नवीन शैक्षणिक धोरण गरजेचे असल्याने मनमाड महाविद्यालयात 12 वी उत्तीर्ण विद्यार्थी व पालक यांच्यासाठी स्कूल कनेक्ट (NEP -2020 Connect) कार्यशाळा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. कार्यशाळेची सुरुवात ही सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या गीताने करण्यात आली. तसेच 15 मिनिटांची व्हिडिओ क्लिप दाखविण्यात आली. यामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू तसेच इतर मान्यवर यांनी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण याविषयी आपले मनोगत मांडले. या कार्यशाळेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून पंचवटी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एस. जगदाळे सर हे होते. त्यांनी मार्गदर्शन करतांना आजच्या स्पर्धेमध्ये आपला विद्यार्थी टिकावा याकरीता कौशल्य आधारित ज्ञान विद्यार्थ्यांना देणे गरजेचे आहे. वेगवेगळ्या विभागात नोकरी व व्यवसायामध्ये मोठी संधी असून बदलत्या कार्यशैलीबरोबर विद्यार्थ्यांचे ज्ञान बदलण्याकरीता नवीन शैक्षणिक धोरण अत्यंत महत्त्वाचे ठरणारे आहे. तसेच आजच्या विद्यार्थ्यांनी आंतरराष्ट्रीय विद्यापीठांमध्ये ऑनलाईन कोर्स करू जागतिक स्पर्धेमध्ये स्पर्धा करू शकतात तसेच भारतातील तरुणांना परदेशामध्ये विविध संधी या नवीन शैक्षणिक धोरणामुळे उपलब्ध होतील. आदरणीय प्राचार्य. डॉ. बी. एस.जगदाळे सर यांनी उपस्थित सर्व विद्यार्थी आणि पालक यांना PPT द्वारे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाबद्दल सखोल असे मार्गदर्शन केले. यावेळी या कार्यशाळेचे अध्यक्ष तसेच मनमाड महाविद्यालयाचे प्राचार्य. डॉ. सुभाष निकम सर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात्मक वैशिष्ट्य अभ्यासणे आवश्यक आहे. नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करतांना शिक्षकांची भूमिका कोणती? शिक्षणातील तोचतोचपणा घालवून शिक्षकांनी आपले ज्ञान अद्ययावत करणे कसे आवश्यक आहे, यासंदर्भातही डॉ. सुभाष निकम सर यांनी मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तसेच प्रमुख पाहुण्यांचा परिचय डॉ. गणेश गांगुर्डे यांनी केला.या कार्यशाळेस महाविद्यालयातील इतर सर्व प्राध्यापक व इतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी व पालक यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती नोंदवली. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. बी.एस. देसले सर यांनी केले. प्रमुख मान्यवरांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात काही पालक तसेच विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले.


अजून बातम्या वाचा..

श्रावण मास अंगारक (मंगळी ) संकष्ट चतुर्थी निमित्त मंगळवार दिनांक 12/08/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात विशेष धार्मिक कार्यक्रमा चे आयोजन

श्रावण मास अंगारक (मंगळी ) संकष्ट चतुर्थी निमित्त मंगळवार दिनांक 12/08/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात विशेष धार्मिक कार्यक्रमा चे आयोजन

मनमाड - शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील...

read more
भारतीय जनता पार्टी मनमाड शहर प्रणित भाजप कामगार आघाडीच्या शहर शाखेच्या फलकाचे उदघाटन

भारतीय जनता पार्टी मनमाड शहर प्रणित भाजप कामगार आघाडीच्या शहर शाखेच्या फलकाचे उदघाटन

मनमाड - भारतीय जनता पार्टी देश स्तरावर विविध क्षेत्रामध्ये काम करीत असते कामगार क्षेत्रामध्ये...

read more
.