कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर यांनी योगा दिनानिमित्त विद्यार्थ्यांना योगाचे महत्व समजावून सांगितले जीवनात शारीरिक मानसिक आणि अध्यात्मानुसार योगासन केल्यास विकास घडवून आणता येतो त्याचा प्रत्यय ज्या लोकांना येतो ते रोज नियमित योगा करतात अशी अनेक उदाहरणं देऊन शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी योगा दिनानिमित्त प्रात्यक्षिक केली इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी या योगा दिनाचे आयोजन केलेले होते .सृष्टी सोनवणे.सई शाका द्विपी.अंतरा कोठावदे. लावण्या पाटील .आराध्या सांगळे. या विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षिके करून दाखवली योगासनामध्ये भुजंगासन. वज्रासन. ताडासन. त्रिकोणासन. वृक्षासन. पर्वतासन .अर्धचक्रासन. पद्मासन. नौकासन. दंडासन. कपालभाती. सूर्यनमस्कार .यांची प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आली. योगासनानंतर प्राणायाम व ध्यान याचे महत्त्व देखील समजावून सांगण्यात आले. विद्यार्थ्यांना योगासना विषयीचे फायदे व महत्त्व समजावून सांगितले. कार्यक्रमाला शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर.मुख्याध्यापक दीपक व्यवहारे. उपप्राचार्य वैभव कुलकर्णी. विश्वस्त धनंजय निंभोरकर यांच्यासह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सौ संगीता देसले कदम यांनी केले. या विद्यार्थ्यांना . पी टी शिक्षक विशाल झाल्टे यांचे अनमोल असे मार्गदर्शन लाभले. इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांना सौ अनिता शाकाद्विपी आणि प्रवीण आहेर यांचे मार्गदर्शन लाभले.