loader image

छत्रपती शाहू महाराजांना वंदन – ग्रुपच्या वतीने वृक्षारोपण

Jun 28, 2024


 

नांदगाव : मारुती जगधने
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना विनम्र अभिवादन करुन त्यांच्या जयंती निमित्त हजारो वृक्ष लावण्याचा संकल्प छञपती शाहू महाराज सोशल ग्रुपच्या वतीने करण्यात आला.
पर्यावरणाचे रक्षण करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे.असा सुर या प्रसंगी उमटला.

२६ जून नांदगाव येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती निमित्त सारनाथ बुद्ध विहार येथे मान्यवरांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी फरहान खान हे होते तर दीपप्रज्वलन भास्कर निकम, विलास कोतकर विश्वास आहिरे यांनी केले.
या प्रसंगी छञपती शाहु महाराजांच्या प्रतिमेचे पूजन
डॉ. ख्याती तुसे,मनिषा पाटील (वन रक्षक) संगीता वाघ, अॅड विद्या कसबे अनिता पाटील यांनी पुजन केले तर
छत्रपती शाहू महाराज सोशल ग्रुपच्या वतीने पत्रकार संजीव धामणे,योगेश (बबलू) पाटील, सागर हिरे,संतोष कांदे,मारुती जगधने,राजू जाधव, आदी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

तसेच अॅड विद्या कसबे, सुनील जाधव,भास्कर निकम, पर्यावरणाचे संतुलन ठेवण्यासाठी वृक्षारोपण व संवर्धन करणे काळाची गरज आहे. पर्यावरणाचे रक्षण करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे यादींनी आपले मनोगत व्यक्त करुन या सुंदर अशा वृक्षारोपन करुन जयंतीचं अभिवादन करुन या संकल्पनेचं कौतुक करून ग्रुपच्या सदस्यांना शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाचे आभार महावीर जाधव यांनी मानले तर
प्रास्ताविक
माजी नगरसेवक नितीन जाधव यांनी केले होते.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रशांत गरुड़ (अध्यक्ष), दीपक मोरे (उपाध्यक्ष)
प्रमोद पगारे, किरण पवार, सोमनाथ चौधरी,गौतम काकळीज, सोहेल रंगरेज़,प्रवीण इघे,जफर शेख,राज पवार,अली शेख, स्वप्निल इघे, कुणाल भोसले, गौरव गूढेकर.आदी उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

  मनमाड - शहरात गेली 29 वर्ष कार्यरत असलेली व मनमाड शहराची अर्थ वाहिनी असलेल्या प्रगती अर्बन...

read more
भुमी क्रिकेट अकॅडमीतील आर्या साळुंखे , स्वरांजली पवार व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला अंडर 15 संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील आर्या साळुंखे , स्वरांजली पवार व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला अंडर 15 संघात निवड

मनमाड - BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी (...

read more
सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

मनमाड- महाराष्ट्र बास्केटबॉल असोसिएशन यांच्या मान्यतेने तसेच नाशिक डिस्ट्रिक्ट बास्केटबॉल असोसिएशन...

read more
.