Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

राज्यात ज्येष्ठांसाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत घोषणा

Jun 29, 2024

मुंबई, दि. २९: राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थस्थळांचे दर्शन घडविण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत केली. या योजनेसाठी धोरण आणि नियमावली तयार करून ज्येष्ठांना शासनाच्या माध्यमातून तीर्थस्थळांच्या दर्शनासाठी नेण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी य़ावेळी सांगितले.

यासंदर्भात विधानसभा सदस्य प्रताप सरनाईक यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले, आमचे सरकार सर्वसामान्यांचे असून काल मांडण्यात आलेल्या अतिरिक्त अर्थसंकल्पामध्ये शेतकरी, कष्टकरी, वारकरी, कामगार, महिला, युवा यांच्यासाठी विविध तरतुदी केल्या आहेत.

आपला महाराष्ट्र संतांची भूमी असून दरवर्षी अनेक जण तीर्थस्थळांना भेटी देतात. ज्येष्ठ नागरिकांना तीर्थस्थळांचे दर्शन सुलभपणे होण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी सर्वंकष धोरण तयार करून त्याची नियमावली केली जाईल. त्याअंतर्गत आवर्तन पद्धतीने, ऑनलाईन अर्ज मागवून ही योजना राबविण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी झालेल्या चर्चेत सर्दस्य राम कदम, प्रकाश सुर्वे, श्रीमती देवयानी फरांदे, मनिषा चौधरी आदी सदस्यांनी भाग घेतला.

अजून बातम्या वाचा..

मनमाड नगरपरिषद मार्फत तिरंगा ध्वज विक्री केंद्र 1. नगरपरिषद कार्यालय 2. जुने होमगार्ड कार्यालय, जयश्री टाॅकीज शेजारील शाॅपींग सेंटर 3. वाचनालय समोरील वक्रांगी सेंटर IUDP शाॅपींग सेंटर . मुख्याधिकारी – मनमाड नगरपरिषद मनमाड

मनमाड नगरपरिषद मार्फत तिरंगा ध्वज विक्री केंद्र 1. नगरपरिषद कार्यालय 2. जुने होमगार्ड कार्यालय,...

read more
तारीख ९ ..शिंदेगटाचे मंत्री ९..भाजपाचे मंत्री ९ ;आगळा वेगळा मुहूर्त साधत अखेर मंत्रिमंडळ विस्तार

तारीख ९ ..शिंदेगटाचे मंत्री ९..भाजपाचे मंत्री ९ ;आगळा वेगळा मुहूर्त साधत अखेर मंत्रिमंडळ विस्तार

राज्याचा 40 दिवसांपासून रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार अखेर आज पार पडला असून आज 11 वाजता राजभवनातील...

read more
केंद्र सरकारच्या धोरणाच्या विरोधात मनमाड ला वीज कर्मचारी संघटनांचे कामबंद आंदोलन

केंद्र सरकारच्या धोरणाच्या विरोधात मनमाड ला वीज कर्मचारी संघटनांचे कामबंद आंदोलन

वीज दुरुस्ती विधयेक २०२२ लोकसभेत एकतर्फी मंजूर करण्याच्या केंद्र सरकारच्या धोरणाच्या विरोधात मनमाड...

read more
बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू हिने कॅनडाच्या मिशेल लीविरुद्ध विजय मिळवत सुवर्णपदकाला गवसणी घातली

बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू हिने कॅनडाच्या मिशेल लीविरुद्ध विजय मिळवत सुवर्णपदकाला गवसणी घातली

कॉमनवेल्थ बॅडमिंटन महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात भारताची बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू हिने कॅनडाच्या...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]