loader image

बघा व्हिडिओ-गंगाधरी गावात ७० फुट खोल विहिरीत उतरूण सर्प मिञाने उदमांजराला जीवदान दिले

Jul 4, 2024


 

नांदगाव: मारूती जगधने नांदगांव नजिक गंगाधरी येथे विहीरीत पडलेल्या उदमांजराला पशुप्रेमीनी/ सर्पमिञ प्रभाकर निकुंभ यांनी जीवदान दिले.
तालुक्यातील नांदगाव शहरालगत मौजे गंगाधरी येथील शेतकरी मोहन विठ्ठल इघे..यांचे गट क्रमांक 65/2 यांच्या शेतातील विहिरीमध्ये उद मांजर पडले होते. दिनांक 3 रोजी विहिरीत पडलेल्या उदमांजरास सुरक्षित रेस्क्यू केले असून नांदगाव वनपरिक्षेत्र अधिकारी सागर ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि वन्यजीव संरक्षण संस्था नांदगाव तालुका अध्यक्ष वन्यजीव रक्षक तथा सर्पमित्र प्रभाकर निकुंभ विभागाचे अधिकारी सुनील महाले, वनरक्षक अमोल पवार ,संजय बेडवाल , पाटील. तसेच शेतकरी ज्ञानेश्वर अण्णा इघे,भरत मोहन इघे, संयोग रमेश साळुंखे,राजू सोनज इत्यादी शेतकऱ्यांनी या प्रसंगी मदत केली, उद मांजरास जीवदान देण्यात यश आले आहे.. एक वन्य जीव वाचवल्याबद्दल परिसरात सर्वत्र चर्चा आहे.
दरम्यान या प्रसंगी सर्पमिञ निकुंभ यांनी जीव धोक्यात घालुन दोर शिडीच्या मदतीने ७० फुट खोल विहिरीत उतरूण उदमांजराला पकडून जीवदान देत अधिवासत सोडले .
सध्या नांदगांव शहरात खांदेशीवाडा,नांवंदर दवाखाना,के मार्ट आदी ठिकाणी उदमांजर आढळतात त्यामुळे मुले व महिला उदमांजराच्या दहशतीत वावरतात.


अजून बातम्या वाचा..

रिच एज्युकेशन ऍक्शन प्रोग्राम आणि सेंट झेवियर संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने स्टेम प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

रिच एज्युकेशन ऍक्शन प्रोग्राम आणि सेंट झेवियर संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने स्टेम प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

मनमाड - विज्ञान, तंत्रज्ञान अभियांत्रिकी आणि गणित या विषयातील संकल्पना खेळण्याच्या (स्वयंचलित...

read more
शेतकरी,राजकीय, सहकार चळवळीतील , योगदानाबद्दल स्वातंत्र्य सैनिक कॉ. माधवराव गायकवाड जीवनगौरव पुरस्कार 2025 मा. ज्येष्ठ साम्यवादी नेते भाई जयंत पाटील यांना जाहिर

शेतकरी,राजकीय, सहकार चळवळीतील , योगदानाबद्दल स्वातंत्र्य सैनिक कॉ. माधवराव गायकवाड जीवनगौरव पुरस्कार 2025 मा. ज्येष्ठ साम्यवादी नेते भाई जयंत पाटील यांना जाहिर

. शेतकरी,राजकीय, सहकार चळवळीतील , योगदानाबद्दल स्वातंत्र्य सैनिक कॉ. माधवराव गायकवाड जीवनगौरव...

read more
.