मनमाड – “उठा जागे व्हा आणि जोपर्यंत ध्येय प्राप्त होत नाही तोपर्यंत थांबू नका” असा जगाला मूलमंत्र देणारे प्रभावी व्यक्तिमत्व म्हणजे स्वामी विवेकानंद. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक दीपक व्यवहारे,उपप्राचार्य वैभव कुलकर्णी,विश्वस्त धनंजय निंभोरकर, शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर यांच्या हस्ते स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन इयत्ता सातवी व इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांनी केले होते .”कुणी लढले न्यायासाठी सत्यासाठी कोणी लढले धर्मासाठी लढणाऱ्यांमध्ये स्वामी विवेकानंद आदर्श ठरले.” आज प्रत्येक भारतीय स्वामी विवेकानंदांना त्यांचे व्यक्तिमत्व व महान अध्यात्मिक विचारांमुळे ओळखतो. स्वामीजींना विश्वभरात सनातन धर्माच्या प्रचाराबद्दल विशेष ओळखले जाते. स्वामी विवेकानंद हे एक महान तत्त्वज्ञानी व कुशल वक्ता होते .इयत्ता दुसरीची श्रेया पाटील इयत्ता सातवीची अनुष्का सोनवणे,किमया गोटे या विद्यार्थ्यांनी स्वामी विवेकानंद यांच्या बद्दल आपले विचार मांडले. त्यावेळेस विद्यार्थी आणि शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या विद्यार्थ्यांना सौ अनिता शाकाद्वीपी, सौ ऋचा सोनवणे यांचे अनमोल असे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन रुद्र क्षत्रिय ,चैतन्य वडकते या विद्यार्थ्यांनी केले.

मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार
मनमाड - शहरात गेली 29 वर्ष कार्यरत असलेली व मनमाड शहराची अर्थ वाहिनी असलेल्या प्रगती अर्बन...