मनमाड – मनमाड हून मुंबई येथे रोज जाणारी पंचवटी एक्सप्रेस ही कसारा स्टेशन जवळ कपलिंग तुटल्याने इंजिन व एक बोगी पुढे मुंबईच्या दिशेने निघून गेल्याने काही काळ प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकला मात्र काही अंतरावर जावून इंजिन व एक डब्बा थांबल्यामुळे पुढील अनर्थ टळला.
मनमाड मुंबई पंचवटी एक्सप्रेसने कसारा स्टेशन सोडल्यानंतर काही अंतरावर एक्सप्रेसचा इंजिन पासून एक डब्बा पुढे निघून गेला. ही गोष्ट लक्षात येताच तातडीने रेल्वे कर्मचारी घटनास्थळी पोहचले. त्यानंतर इंजिन पुन्हा मागे घेण्यात आल्यावर कपलिंग बसवण्यात येऊन गाडी पुढे मुंबईच्या दिशेने मार्गस्थ झाली.