मनमाड क्रिकेट क्षेत्रात पहिल्यांदाच आयोजीत करण्यात आलेली महाराजा रणजित सिंह जी सिक्स हिटिंग स्पर्धा 15 जुलै 2024 रोजी श्री. गुरुगोबिंद सिंग हायस्कूल ग्राऊंड येथे संपन्न झाली. मनमाड मधील विविध भागातील अनेक खेळाडुंनी या स्पर्धेत उत्साहाने आपला सहभाग नोंदवला.
स्पर्धेचे उद्घाटन शिवसेना शहरप्रमुख मयुर भाऊ बोरसे , एस जी जी एस स्कूलचे प्रशासक सुखदेव सिंह सर , भुमी क्रिकेट अकॅडमीचे आधारस्तंभ ईरफानभाई मोमीन तसेच सुनील भाऊ हांडगे , तय्यबभाई शेख, शेरू भाई शेख ,राहुल साबळे , गजु कासार या मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला.
या स्पर्धेत सहभागी झालेल्या फलंदाजांनी मारलेल्या षटकारांची लांबी मोजण्यात आली व सर्वात लांब मारलेल्या दोन षटकारांना रोख रक्कमेची पारितोषिक देण्यात आले.
मनसुफ शाह या फलंदाजाला स्पर्धेचे प्रथम पारितोषिक 1501 रु. तसेच दक्ष पाटिल या फलंदाजाला या स्पर्धेचे दुसरे पारितोषिक 1001 रु. देण्यात आले. दोन्ही पारितोषिके सुरज अरोरा सर यांच्या सौजन्याने देण्यात आली. स्पर्धेत तय्यबभाई शेख व जावेद भाई शेख यांचे विशेष सहकार्य लाभले.
स्पर्धेचे आयोजन भूमी क्रिकेट अकॅडमीचे आधारस्तंभ ईरफानभाई मोमीन व संचालक सिध्दार्थ रोकडे यांच्याद्वारे करण्यात आले.