loader image

बघा व्हिडिओ-गंगाधरीच्या माजी सरपंचांनी वाढदिवस साजरा केला चक्क स्मशान भूमीत

Jul 21, 2024


नांदगाव : वाढदिवस म्हटले की कुठे रस्त्यावर ,हॉटेल किंवा घरी ,मंगलकार्यालय आदी ठिकाणी साजरा होतो पण गंगाधरी ता.नांदगाव चे माजी सरपंच भगीरथ जेजुरकर यांचा वाढदिवस चक्क स्मशान भुमीत साजरा झाला एवढेच काय पण जेथे मृतदेह जळतो तेथेच केक कापुन सर्वांनी गोड तोंड केले.
सविस्तर वृत्त असे की स्मशानभूमीत
ज्या जागेवर प्रेत ठेऊन सरन रचले जाते त्याच जागेवर वाढदिवसाचा केक कापून वाढदिवस साजरा झाला.
जेजुरकर हे गत २५ वर्षापासून महाराष्ट्र अंधश्रध्दा निमृलन समितीचे सक्रिय कार्यकर्ते म्हणून काम करतात त्यांनी अनिसच्या विविध पदावर प्रभावीपणे काम करीत आहे .त्यांच्या वाढदिवसा निमित्ताने समाजत आसलेल्या विविध रूढी परंपरा रितीरीवाजाना फाटा देत हा वाढदिवस गंगाधरी ग्रांमपंचायतीच्या स्मशान भुमीत साजरा करण्यात आला एरवी स्मशानात लोक अंत्यविधीला जातात पण दि १९ रोजी स्मशानात केक कापून, जेजुरकर यांचा सत्कार करुन, उपस्थीतांचे गुलाबफुल देऊन स्वागत करुन टाळ्यांच्या गजरात वाढदिवस साजरा झाला या आगळ्या वेगळ्या उपक्रमासाठी पोलीस पाटील स्वप्निल शिंदे,आम आदमीचे जिल्हा उपाध्यक्ष विशाल वडगुले, पञकार मारुती जगधने,किरण काळे, कार्याध्यक्ष
प्रभाकर निकुंभ, दिगंबर भागवत(ग्राप सदस्ये) , सर्पमिञ मंगेश आहेर,उमेश महाजन,नयन जाधव, आदित्त जाधव,मयुर जेजुरकर,धिरज कमोदकर,भरत इघे, आदीसह नागरीक उपस्थित होते.
या दरम्यान स्मशानात अंधाराचा काळोख असल्याने मोबाईलच्या बॅटरीने व दुचाकीच्या उजेडात राञी ९ वाजता हा वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी मारुती जगधने, सर्पमिञ प्रभाकर निकुंभ, विशाल वडगुले पोलीस पाटील शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले.या आगळ्या वेगळ्या वाढदिवसाची नांदगांव शहरात चर्चा उमटली अत्यंत शिस्तबध्द पध्दतीत हा कार्यक्रम संपन्न झाला शेवटी स्मशानात उपस्थीताना फराळ देण्यात आला सर्वानी गोडतोंड करुन घरी परतले. यापूर्वी जेजुरकर यांचे दोन वाढदिवस स्मशानात साजरे झाले हा तिसर्यांदा वाढदिवस स्मशानत साजरा झाला .या वेळी अनिसचे मारूती जगधने यांचे मार्गदर्शन लाभले
स्मशानभुमीतील स्वच्छता करुन नंतर तेथे वाढदिवस साजरा झाला.


अजून बातम्या वाचा..

मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

  मनमाड - शहरात गेली 29 वर्ष कार्यरत असलेली व मनमाड शहराची अर्थ वाहिनी असलेल्या प्रगती अर्बन...

read more
भुमी क्रिकेट अकॅडमीतील आर्या साळुंखे , स्वरांजली पवार व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला अंडर 15 संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील आर्या साळुंखे , स्वरांजली पवार व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला अंडर 15 संघात निवड

मनमाड - BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी (...

read more
सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

मनमाड- महाराष्ट्र बास्केटबॉल असोसिएशन यांच्या मान्यतेने तसेच नाशिक डिस्ट्रिक्ट बास्केटबॉल असोसिएशन...

read more
.