मनमाड : येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथील कनिष्ठ महाविद्यालयातील मराठी विभागाचे उपशिक्षक श्री विठ्ठल सातपुते हे एप्रिल २०२४ च्या शिक्षणशास्त्र विषयातील सेट परीक्षा उत्तीर्ण झाले ते याआधी सप्टेंबर २०१६ मध्ये राज्यशास्त्र विषयात सेट परीक्षा उत्तीर्ण झाले.
त्यांच्या या यशाबद्दल महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेचे जनरल सेक्रेटरी डॉ. प्रशांतदादा हिरे, संस्थेच्या कोषाध्यक्ष डॉ स्मिताताई हिरे, समन्वयक डॉ.अपूर्वभाऊ हिरे, युवा नेते अद्वयआबा हिरे, विश्वस्त मा. संपदादीदी हिरे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस. एन. निकम, उपप्राचार्य डॉ .बी.एस. देसले तसेच सर्व प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी विठ्ठल सातपुते यांचे अभिनंदन केले.

मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार
मनमाड - शहरात गेली 29 वर्ष कार्यरत असलेली व मनमाड शहराची अर्थ वाहिनी असलेल्या प्रगती अर्बन...