मनमाड – मनमाड शहर भाजप मंडलाच्या वतीने सन 2005 पासून भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सर्व ज्ञात अज्ञात क्रांतीकारकांना (शहिदांना) रक्तदानाने आदरांजली देण्यासाठी रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात येते. याच देशभक्तीच्या परंपरेला अखंडपणे सुरु ठेवत यंदाही 77 व्या स्वातंत्र्य दिना च्या पूर्व संध्ये ला अखंड भारत दिना निमित्ताने सलग 20 व्या वर्षी बुधवार दि.14 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 9.-30 ते 3 -.30 वाजेपर्यंत लोकमान्य सभागृह, इंडियन हायस्कुल मनमाड येथे भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन मनमाड शहर भाजपतर्फे करण्यात आले आहे.या रक्तदान शिबीर कार्यक्रम ला प्रमुख अतिथी म्हणून माजी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्य मंत्री आदरणीय डॉ सौ भारतीताई पवार व भाजपा नासिक जिल्हा अध्यक्ष आदरणीय शंकरराव वाघ हे उपस्थित राहणार आहेत तरी या रक्तदान शिबीरात मनमाड शहर व परिसरातील सर्व ऐच्छिक रक्तदात्यांनी येवून भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील शहिदांना रक्तदानाने आदरांजली वाहावी असे आवाहन रक्तदान शिबीराचे निमंत्रक ,भाजप मनमाड शहर अध्यक्ष संदीप नरवडे व रक्तदान शिबिर संयोजक भाजपा नासिक जिल्हा उपाध्यक्ष नितीन पांडे यांनी केले आहे. रक्तसंकलन जनकल्याण रक्तकेंद्र नाशिक हे करणार आहेत .