रविवार 18 ऑगस्ट 2024, भुमी क्रिकेट अकॅडमी व श्री.गुरुगोबिंद सिंग हायस्कूल आयोजीत आमंत्रितांच्या अंडर 14 लेदर बाॅल T20 स्पर्धा श्री. गुरुगोबिंद सिंग हायस्कूल ग्राऊंड मनमाड येथे खेळवल्या जात आहे.
स्पर्धेत मनमाड संघाचा प्रथम सामणा पाचोरा अंडर 14 संघासोबत झाला. या सामण्यात नाणेफेक जिंकुन पाचोरा अंडर 14 संघाने प्रथम फलंदाजी करण्याचे ठरवले. 19.4 षटकात 9 गडी गमवत 127 धावा जमवल्या ज्याचे प्रत्युत्तरात भुमी क्रिकेट अकॅडमी मनमाड अंडर 14 संघाने 14.3 षटकात 4 गडी राखुन स्पर्धेतील आपल्या पहिल्या सामण्यात विजय प्राप्त केला. सामण्यात मनमाड संघाकडुन सर्वाधिक धावा करणारा युवराज शर्मा हा सामनावीर ठरला. युवराजने 37 चेंडुमध्ये 12 चौकारांच्या मदतीने 60 नाबाद धावा करुन आपल्या संघास एक सोपा विजय मिळवुन दिला. या सोबतच सामण्यात मनमाड संघाचा कर्णधार हसन शेख 17 चेंडूत 30 धावा जमवुन महत्वाची कामगिरी पार पाडली. गोलंदाजीमध्ये खुशाल परळकर, हसनेन शेख व आर्यन भंडारि यांनी प्रत्येकी 2 बळी मिळवले.
6 संघाच्या या साखळी सामण्यामध्ये अजुनही मनमाड अंडर 14 संघाचे 5 सामने उर्वरित आहेत.
या प्रदर्शनासाठी मनमाडमधील या नवोदित खेळाडुंची प्रशंसा केली जात आहे. युवराजच्या या विजयी खेळीचे सर्वत्र कौतुक करण्यात आले.
या स्पर्धेत चांगले प्रदर्शन करुन हि स्पर्धा मनमाड संघ जिंको अशी शुभेच्छा त्यांना देण्यात येत आहे.
मनमाड गुरुद्वारा चे जत्तेदार बाबा रणजीत सिंह जी यांनी या खेळाडुंला प्रदर्शनासाठी अभिनंदन केले.
भुमी क्रिकेट अकॅडमीचे आधारस्तंभ ईरफान भाई मोमीन , राजाभाऊ पगारे , गणेश धात्रक, श्रेणिक बरडिया , अंकित पगारे , तय्यबभाई शेख, हबीब शेख , शुभम बापु गायकवाड, सिध्दार्थ बरडिया , कौशल शर्मा , भुषण शर्मा , परवेज शेख , सनी फसाटे , सनी पाटिल, मनोज ठोंबरे सर , दक्ष पाटिल, साहील मोरे , मयुरेश परदेशी , चिराग निफाडकर , रोहित पवार , लविशा दौलानी , भाविका कौराणी , सुहानी बोरा , आर्या साळुंखे , स्वरांजली पवार , गुरज्योत कौर मंगत तसेच संचालक वाल्मीक रोकडे यांनी खेळाडुंचे अभिनंदन करुन पुढिल सामन्यांसाठी शुभेच्छा दिल्या.
या खेळाडुंना मार्गदर्शन सिध्दार्थ ( भोला ) रोकडे सरांचे लाभले असुन श्री. गुरुगोबिंद सिंग हायस्कूल मनमाडचे प्रशासक श्री. सुखदेव सिंग जी सर यांचे विशेष सहकार्य लाभले. त्यांना पुढिल सामन्यांसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.