बुधवार 21 ऑगस्ट 24, महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या अंडर 19 ( जिल्हास्तरीय ) स्पर्धा एप्रिल महिन्यात पुणे येथे खेळवल्या गेल्या. या क्रिकेट स्पर्धेत मनमाडमधील भुमी क्रिकेट अकॅडमीतील खेळाडु रुषी शर्मा हा नंदुरबार जिल्ह्यातर्फे खेळला.
2 दिवसाच्या कसोटी सामण्यात मनमाड मधील ह्या खेळाडुने नंदुरबार संघाकडुन पुर्ण स्पर्धेमध्ये दमदार कामगीरी करण्यात तो समर्थ ठरला.
05 कसोटी सामण्यात विविध जिल्ह्य़ाच्या संघासमोर त्याने 28 बळी टिपुन स्पर्धेत सर्वाधिक बळी मिळवण्याच्या यादित संपूर्ण महाराष्ट्रात 22 व्या क्रमांकावर आपली जागा बनवली. 05 सामन्यांच्या 10 डावात त्याने 4 वेळा एका डावात 05 बळी तसेच एका सामण्यात पूर्ण 10 बळी मिळवुन आपली वेगळी कामगिरी बजावली. या सर्व प्रदर्शनाच्या जोरावर आता त्याला महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन अंडर 19 संघाच्या कॅम्पसाठी पुणे येथे बोलवण्यात आले असुन मनमाड व नांदगाव तालुक्यातील हा मान मिळवणारा तो पहिला क्रिकेट खेळाडु ठरला आहे.
मागील वर्षीही महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन यांच्या आमंत्रिताच्या अंडर 16 सुपरलीग स्पर्धेत पुणे येथे पुणे संघाविरुध्द खेळताना एकाच सामण्यात 10 बळी टिपण्यास त्याने यश प्रप्त केले होते परंतु महाराष्ट्र संघात जागा बणवण्यासाठी तो अपयशी ठरला. यावर्षीही सलग दुसर्यांदा हि कामगिरी रुषीने केली आहे. रूषी हा भुमी क्रिकेट अकॅडमीमध्ये येथे सराव करतो.
ह्या प्रदर्शनासाठी मनमाडमधील या नवोदित खेळडुची प्रशंसा केली जात आहे व यापुढे हि त्याने चांगले प्रदर्शन करुन महाराष्ट्र अंडर 19 संघात निवड होऊन मनमाडचे प्रतिनिधित्व महाराष्ट्र संघात करावे अशी शुभेच्छा त्याला देण्यात येत आहे.
नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन चे सचिव युवराज पाटील सर यांचे खास मार्गदर्शन व सहयोग रुषीच्या निवडीसाठी लाभले.
मनमाड गुरुद्वारा प्रबंधक जत्तेदार बाबा रणजीत सिंह जी यांचे खास सहयोग भूमी क्रिकेट अकॅडमीतील खेळाडुंना लाभले.
नांदगाव मतदार संघाचे आमदार श्री. सुहास आण्णा कांदे व भुमी क्रिकेट अकॅडमीचे आधारस्तंभ ईरफान मोमीन , राजाभाऊ पगारे , गणेश धात्रक, आमीन पटेल , श्रेणिक बरडिया , अंकित पगारे , तय्यब शेख, हबीब शेख , शुभम बापु गायकवाड, सिध्दार्थ बरडिया , कौशल शर्मा , परवेज शेख , सनी फसाटे , सनी पाटिल, मनोज ठोंबरे सर , दक्ष पाटिल, साहील मोरे , मयुरेश परदेशी , चिराग निफाडकर , रोहित पवार तसेच संचालक वाल्मीक रोकडे यांनी खेळाडुंचे अभिनंदन करुन पुढिल वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
रुषीला खेळातील मार्गदर्शन सिध्दार्थ ( भोला ) रोकडे सरांचे लाभले असुन श्री. गुरुगोबिंद सिंग हायस्कूल मनमाडचे प्रशासक श्री. सुखदेव सिंग जी सर यांचे विशेष सहकार्य लाभले.
महाराष्ट्र संघाच्या या कॅम्प मधुन निवड होऊन मनमाड व नांदगाव तालुक्यातील प्रथम महाराष्ट्र खेळणारा खेळाडु रुषी होवो अश्या शुभेच्छा त्याला देण्यात आल्या.