loader image

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजनेचे उत्कृष्ट महाविद्यालय व कार्यक्रम अधिकारी पुरस्कार मनमाड महाविद्यालयस जाहीर

Aug 25, 2024


राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ. पवनसिंग परदेशी यांना विद्यापीठस्तरीय सर्वोत्कृष्ट कार्यक्रमाधिकारी पुरस्कार जाहीर महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड या महाविद्यालयाला राष्ट्रीय सेवा योजनेचा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील सर्वोत्कृष्ट महाविद्यालय,राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ.पवनसिंग बाबूसिंग परदेशी यांना रासेयो विद्यापीठ स्तरीय सर्वोत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी तसेच प्रा. सोमनाथ पावडे यांना रासेयो प्रशंसा प्रमाणपत्र पुरस्कार नुकतेच जाहीर झाले. महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाने मागील पाच वर्षात केलेले विविध उपक्रम त्यामध्ये रक्तदान, वृक्षारोपण, रस्ता सुरक्षा अभियान, जलसंधारण, आरोग्य जनजागृती उपक्रम, प्लास्टिक विषयी जनजागृती पथनाट्य, विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना वाव देणे, दरेगाव-शिंगवे- पानेवाडी- वंजारवाडी या दत्तक गावांमध्ये विविध उपक्रम अशा क्षेत्रांमध्ये भरीव कामगिरी केल्याबद्दल सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने मनमाड महाविद्यालयाला राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यापीठातील सर्वोत्कृष्ट महाविद्यालय व ही जबाबदारी सांभाळणारे डॉ. पवनसिंग परदेशी यांना विद्यापीठस्तरीय उत्कृष्ट कार्यक्रमाधिकारी पुरस्कार जाहीर केला आहे. या जबाबदारीला समर्थपणे सांभाळणारे प्रा सोमनाथ पावडे यांना प्रशंसा प्रमाणपत्र पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. यासाठी महाविद्यालयाचे कर्तव्यदक्ष, कार्यसंपन्न प्राचार्य डॉ.सुभाष निकम यांनी कार्यक्रम अधिकाऱ्यांचे सत्कार केले.याबद्दल महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेच्या कोषअध्यक्षा महिलारत्न मा पुष्पाताई हिरे, संस्थेचे जनरल सेक्रेटरी समाजश्री डॉ.प्रशांतदादा हिरे, मा. स्मिताताई हिरे, डॉ.अपूर्व भाऊ हिरे, डॉ.अद्वय आबा हिरे, संपदादीदी हिरे, उपाध्यक्ष प्राचार्य डॉ.हरिष आडके, प्राचार्य डॉ.बी एस जगदाळे, डॉ. व्ही एस मोरे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष निकम, प्राचार्य डॉ.ए व्ही. पाटील उपप्राचार्य डॉ. बी. एस देसले, कुलसचिव समाधान केदारे, शैक्षणिक परिवेक्षक प्रा डी व्ही सोनवणे, सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ प्राध्यापकवृंद, प्रशासकीय कर्मचारी, सहकारी कार्यक्रमाधिकारी प्रा.गणेश गांगुर्डे, प्रा वर्षाराणी पेढेकर, प्रा कविता काखंडकी, डॉ. विठ्ठल नजरधने,विद्यार्थी, रासेयो स्वयंसेवक स्वयंसेविका यांनी या पुरस्काराबद्दल महाविद्यालयाचे व कार्यक्रम अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.


अजून बातम्या वाचा..

रिच एज्युकेशन ऍक्शन प्रोग्राम आणि सेंट झेवियर संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने स्टेम प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

रिच एज्युकेशन ऍक्शन प्रोग्राम आणि सेंट झेवियर संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने स्टेम प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

मनमाड - विज्ञान, तंत्रज्ञान अभियांत्रिकी आणि गणित या विषयातील संकल्पना खेळण्याच्या (स्वयंचलित...

read more
शेतकरी,राजकीय, सहकार चळवळीतील , योगदानाबद्दल स्वातंत्र्य सैनिक कॉ. माधवराव गायकवाड जीवनगौरव पुरस्कार 2025 मा. ज्येष्ठ साम्यवादी नेते भाई जयंत पाटील यांना जाहिर

शेतकरी,राजकीय, सहकार चळवळीतील , योगदानाबद्दल स्वातंत्र्य सैनिक कॉ. माधवराव गायकवाड जीवनगौरव पुरस्कार 2025 मा. ज्येष्ठ साम्यवादी नेते भाई जयंत पाटील यांना जाहिर

. शेतकरी,राजकीय, सहकार चळवळीतील , योगदानाबद्दल स्वातंत्र्य सैनिक कॉ. माधवराव गायकवाड जीवनगौरव...

read more
.