Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

लेदर बाॅल टी 20 स्पर्धेत मनमाड अंडर 14 संघाचा नांदगाव अंडर 14 संघावर विजय – अर्धशतकीय हसन शेख सामनावीर

Sep 4, 2024

 

मनमाड – शनिवार 31 ऑगस्ट 2024, भुमी क्रिकेट अकॅडमी व श्री.गुरुगोबिंद सिंग हायस्कूल आयोजीत महाराजा रणजित सिंहजी अंडर 14 लेदर बाॅल टी 20 स्पर्धा श्री. गुरुगोबिंद सिंग हायस्कूल ग्राऊंड मनमाड येथे खेळवल्या जात आहे.
स्पर्धेत मनमाड संघाचा तृतीय सामना नांदगाव अंडर 14 संघासोबत झाला. या सामण्यात नाणेफेक जिंकुन मनमाड संघाने प्रथम फलंदाजी करण्याचे ठरवले. 20 षटकात 06 गडी गमवत 239 धावा मनमाडच्या फलंदाजांनी जमवल्या.

धावांच्या प्रत्युत्तरात नांदगाव संघाने 17 षटकात 10 गडी गमववुन फक्त 79 धावा जमवु शकले व त्यांना ह्या सामन्यात पराभव पत्करावा लागला.

सामण्यात मनमाड संघाकडुन सर्वाधिक धावा करणारा हसन शेख हा सामनावीर ठरला. हसनने 29 चेंडुमध्ये 06 षटकार व 10 चौकारांच्या मदतीने 85 धावा करुन आपल्या संघास एक मजबुत स्थितीमध्ये आणण्यास मदत केली. या सोबतच या सामण्यात मनमाड संघाचा हसनेन शेख 44 चेंडूत 50 धावा जमवुन अर्धशतक करुन महत्वाची कामगिरी पार पाडली. गोलंदाजीमध्ये आर्यन भंडारि याने 4 बळी मिळवले तसेच खुशाल परळकर याने 2 बळी मिळवले.

6 संघाच्या या साखळी सामण्यामध्ये अजुनही मनमाड अंडर 14 संघाचे 2 सामने उर्वरित आहेत.

या प्रदर्शनासाठी मनमाडमधील या नवोदित खेळाडुंची प्रशंसा केली जात आहे. हसनच्या या विजयी खेळीचे सर्वत्र कौतुक करण्यात आले.
या स्पर्धेत चांगले प्रदर्शन करुन ही स्पर्धा मनमाड संघ जिंको अशी शुभेच्छा त्यांना देण्यात येत आहे.

मनमाड गुरुद्वारा चे जत्तेदार बाबा रणजीत सिंह जी यांनी या खेळाडुंला प्रदर्शनासाठी अभिनंदन केले.

भुमी क्रिकेट अकॅडमीचे आधारस्तंभ ईरफान मोमीन , राजाभाऊ पगारे , गणेश धात्रक, श्रेणिक बरडिया , अंकित पगारे , तय्यबभाई शेख, हबीब शेख , शुभम बापु गायकवाड, सिध्दार्थ बरडिया , कौशल शर्मा , भुषण शर्मा , परवेज शेख , सनी फसाटे , सनी पाटिल, मनोज ठोंबरे सर , दक्ष पाटिल, साहील मोरे , मयुरेश परदेशी , चिराग निफाडकर , रोहित पवार , लविशा दौलानी , भाविका कौराणी , सुहानी बोरा , आर्या साळुंखे , स्वरांजली पवार , गुरज्योत कौर मंगत तसेच संचालक वाल्मीक रोकडे यांनी खेळाडुंचे अभिनंदन करुन पुढिल सामन्यांसाठी शुभेच्छा दिल्या.

या खेळाडुंना मार्गदर्शन सिध्दार्थ ( भोला ) रोकडे सरांचे लाभले असुन श्री. गुरुगोबिंद सिंग हायस्कूल मनमाडचे प्रशासक श्री. सुखदेव सिंग जी सर यांचे विशेष सहकार्य लाभले. त्यांना पुढिल सामन्यांसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

अजून बातम्या वाचा..

मनमाड शहर भाजपा तर्फे पंडित दिनदयाळ उपाध्याय यांची 58 वी पुण्यतिथी समर्पण दिन म्हणून साजरी

मनमाड शहर भाजपा तर्फे पंडित दिनदयाळ उपाध्याय यांची 58 वी पुण्यतिथी समर्पण दिन म्हणून साजरी

  मनमाड शहर भाजपा च्या वतीने भारतीय जनसंघाचे संस्थापक व भाजपा च्या कार्यकर्त्यांन चे प्रेरणा...

read more
एच.ए.के. हायस्कूल अँन्ड ज्यु. कॉलेज मनमाड मध्ये इयत्ता 12 वी प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी / मार्च 2026 आसनव्यवस्था जाहीर.

एच.ए.के. हायस्कूल अँन्ड ज्यु. कॉलेज मनमाड मध्ये इयत्ता 12 वी प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी / मार्च 2026 आसनव्यवस्था जाहीर.

  मनमाड : इयत्ता 12 वी प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी / मार्च 2026 केंद्र क्रमांक 0236 एच.ए....

read more
शिस्त–जिद्द–ध्येयाचा संदेश देत सिद्धी क्लासेस कॅम्पसचा ‘आशीर्वाद व शुभेच्छा सोहळा’ दिमाखात संपन्न

शिस्त–जिद्द–ध्येयाचा संदेश देत सिद्धी क्लासेस कॅम्पसचा ‘आशीर्वाद व शुभेच्छा सोहळा’ दिमाखात संपन्न

      मनमाड : येथील शिक्षण क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केलेल्या सिद्धी क्लासेस...

read more
नरेंद्रजी मोदी 3-0 सरकारचा ऐतिहासिक अर्थ संकल्पा मध्ये देशातील “युवा शक्ती केंद्र बिंदू.”देशाच्या प्रगतीची गती  वाढवणारा गतिमान अर्थ संकल्प ~नितीन पांडे

नरेंद्रजी मोदी 3-0 सरकारचा ऐतिहासिक अर्थ संकल्पा मध्ये देशातील “युवा शक्ती केंद्र बिंदू.”देशाच्या प्रगतीची गती वाढवणारा गतिमान अर्थ संकल्प ~नितीन पांडे

संपूर्ण जगात सतत युद्ध जन्य परिस्थिती चे संकट असताना भारताचे शक्तिशाली पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी...

read more
माघ मास संकष्ट चतुर्थी  निमित्त गुरुवार दिनांक 05/02/2026 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम🚩

माघ मास संकष्ट चतुर्थी निमित्त गुरुवार दिनांक 05/02/2026 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम🚩

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]