एका दिवसात भारताच्या काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत इन्स्टाग्राम ,फेसबुक,व्हाट्सएप माध्यमात प्रचंड व्हायरल झालेले ‘शिक्षण मंडळ भगूर’ संस्था संचालित नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव.ता.चांदवड.जि.नाशिक.
या शाळेतील ‘बैलपोळा’ सणानिमित्त कलाशिक्षक देव हिरे यांनी शाळेच्या दर्शनी फळ्यावर केलेलं अप्रतिम फलक रेखाटनाने प्रचंड धुमाकूळ केला.
या अप्रतिम व्हिडियोला इन्स्टाग्रामवर एका दिवसात ( 75 लाख व्हीव्हज) म्हणजे 75लाख लोकांनी हा व्हिडियो बघितला. 7 लाख 17हजार लोकांनी लाईक केला. 1 लाख 40 हजार लोकांनी शेअर केला. व 7000 कमेंट करण्यात आल्या.
तसेच व्हाट्सएप व फेसबुक च्या माध्यमातून लाखो लोकांनी हा फलक रेखाटन व्हिडियो बघितला व शेअर केला. लाखो लोकांनी व्हाट्सए स्टेटसवर हा व्हिडियो ठेवला.
(या व्हिडियोत जे आईचे चित्र आहे ते आमचे कोल्हापूर चे अक्षर मित्र श्री.खापरे सर यांच्या मातोश्रीचे आहे.)
साऱ्या जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी,काळी आई, व त्या काळ्या आईच्या पदरात राब- राब राबणारा मुका इमानदार बैल यांच्या घामाची व कष्टाची जाणीव असलेल्या व मातीशी नाळ जुळलेल्या भारताच्या काना कोपऱ्यातील प्रत्येकाने या फलक चित्रात आपलं गाव,आपली जमीन,आपली आई,आपली आजी,व आपले इमानदार मुके सर्जा राजा बघितले.
गाव शेतात व गावापासून दूर असणाऱ्या प्रत्येकाच्या हृदयास हे फलक रेखाटन स्पर्श करून गेले.
ग्रामीण व शहरी भागातील सर्व विद्यार्थी पालकांसह सर्व शेतकरी बंधू-भगिनी यांनी या व्हिडियोला प्रचंड प्रतिसाद दिला. व हजारो लोकांनी फोन करून अप्रतिम प्रतिक्रिया दिल्या.
गावाच्या मातीपासून व आपल्या परिवारपासून कोसो दूर सीमेवर देशाचं रक्षण करणाऱ्या आपल्या सैनिकांनी हे फलक रेखाटन आज आपल्या मोबाईलवर स्टेटस ला ठेऊन कॉल करून त्यावर भावुक प्रतिक्रिया दिल्या त्यावेळेस खरोखर हे फलक रेखाटन धन्य झाले.