भारताचे दिवंगत राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म दिन.
या दिवशी ज्ञानदान करणाऱ्या शिक्षकांचा गौरव होतो.
शिक्षक हा देशाचा निर्माता आहे. आज शिक्षण हे शिक्षा रहित व धाक रहित झालेले दिसून येते. आधीच्या काळात शिक्षकांविषयी आदरयुक्त भीती असायची.शाळेत शिक्षक शिस्तीचे धडे गिरवंतांना वेळ प्रसंगी छडीचा वापर करायचे त्यामुळे शिक्षण घेतांना शिस्त व धाक असायचा व पालक वर्गातही अशा शिक्षकांविषयी आदरभाव दिसायचा. या शिस्तप्रिय शिक्षकांच्या छडीच्या धाकाने कित्येक विद्यार्थी आज सन्मार्गाला लागले व कित्येक उच्च पदावर कार्यरत झालेत.
“त्या वेळेस जर आमच्या शिक्षकांनी छडी व धाक दाखवला नसता तर आज आपण या योग्य मार्गावर नसतो.” अशी धारणा आजही कित्येक जण बोलून दाखवतात. त्या शिक्षकांची कित्येक उच्चपदस्त विद्यार्थी आजही आपल्या छडी वापरणाऱ्या शिक्षकांना शिक्षक दिनाच्या निमित्ताने आदराने सॅल्युट व नमन करतात.
पण आज ना तो धाक राहिला ना ती शिस्त राहिली ना ती छडी,,,,! आणि म्हणूनच की काय समाजात सर्व नितीमुल्य पायी तुडवली जातांना आपण सर्रास उघड्या डोळ्यांनी बघत आहोत.
“शिक्षकाच्या हातातून छडी गायब झाली अन हे जग बेशिस्त झाले.”
कलाशिक्षक देव हिरे यांनी फलक रेखाटनातून उच्च पदस्त विद्यार्थी शालेय जीवनात शिस्तीचे धडे देणाऱ्या व छडी चा धाक असलेल्या आपल्या प्रिय शिक्षकांना या शिक्षक दिनी आदराने सॅल्युट करतानाचे बोधपूर्ण चित्रण नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव. ता.चांदवड. जि.नाशिक या शाळेच्या दर्शनी फलकावर रेखाटले आहे.