मनमाड :- योगीराज बहुउद्देशीय संस्था संचलित,गुडविल गर्ल्स इंग्लिश मेडीयम स्कूल,मनमाड तर्फे शिक्षक दिनानिमित्त उत्कृष्ट मुख्याध्यापक,शिक्षक,शिक्षकेतर पुरस्कार वितरण सोहळा शाळेत संपन्न झाला.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान छत्रे न्यू इंग्लिश स्कूल, मनमाड संस्थेचे सचिव दिनेश धारवाडकर यांनी भूषविले. गुडविल इंग्लिश मेडियम स्कूलचे संस्थापक ऍडव्होकेट शशिकांत काखंडकी,सहसचिव कविता शशिकांत काखंडकी व सर्व शिक्षिकांनी उपस्थित सर्व पुरस्कारार्थिंचे स्वागत केले.यावेळी उत्कृष्ट मुख्याध्यापक पुरस्कार भुषण दशरथ शेवाळे सर (एच. ए. के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड ), रमेश थोरात सर (मुख्याध्यापक छत्रे हायस्कूल, मनमाड), मुकेश मिसर सर (प्राचार्य के. आर. टी. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज,मनमाड), दीपक व्यवहारे सर (मुख्याध्यापक के.आर.टी. हायस्कूल,मनमाड)),सविता मारणे मॅडम (मुख्याध्यापिका बी.जी.दरगुडे हायस्कूल, मनमाड ), प्रियंका धात्रक मॅडम (मुख्याध्यापिका आदर्श इंग्लिश मेडीयम स्कूल, मनमाड ), संतोष भराडे सर (मुख्याध्यापक माध्यमिक व उच्चमाध्यमिक शाळा,वाघदर्डी ),उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार आयशा मो.सलीम गाजियानी मॅडम (उपशिक्षिका तथा संचालिका एच.ए.के. हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज, मनमाड ),मनोज ठोंबरे सर (न्यू इंग्लिश स्कूल नगरसूल),प्रवीण व्यवहारे सर (क्रीडा शिक्षक छत्रे न्यू इंग्लिश स्कूल,मनमाड),एम. जी. महाविद्यालय,मनमाड चे डॉ. जालिंदर इंगळे सर,डॉ.वसाईत सर, हेमंत वाले सर(सेंट झेवीयर हायस्कूल,मनमाड),डी. पी. त्रिभुवन सर (क्रीडाशिक्षक संत बार्णबा हायस्कूल,मनमाड), पवार सर (संगीत शिक्षक, नांदगाव ),शेख रब्बानी आशिकअली (एच.ए. के.हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड), भाग्यश्री दराडे मॅडम (संचालिका सिद्धी क्लासेस, मनमाड), मुळे मॅडम (योगशिक्षिका,मनमाड),चेतन सदाशिव सुतार(म.रे.मा.विद्यालय,मनमाड),कमलेश अशोक पाटील (एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज,मनमाड) तसेच उत्कृष्ट शिक्षकेतर पुरस्कार दिनेश धारवाडकर (छत्रे हायस्कूल मनमाड संस्थेचे सचिव), शेख जाविद मुश्ताक यांना सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.कार्यक्रमाचे आयोजक तथा गुडविल इंग्लिश मेडीयम स्कूल चे संस्थापक ऍडव्होकेट शशिकांत काखंडकी, सहसचिव कविता शशिकांत काखंडकी यांनी सर्वांचे आभार मानले.उपस्थित पालकांनी आयोजकांचे कौतुक केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शितल हेमगिरे मॅडम व मनोज ठोंबरे सर यांनी केले.

मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार
मनमाड - शहरात गेली 29 वर्ष कार्यरत असलेली व मनमाड शहराची अर्थ वाहिनी असलेल्या प्रगती अर्बन...