loader image

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट संचलि, श्री निलमणी गणेश मंडळ मनमाड – लोकमान्य टिळकांना अभिप्रेत असणाऱ्या आदर्श सार्वजनिक गणेशोत्सवाचे यंदा 28 वे वर्ष

Sep 6, 2024


मनमाड – हिंदू संस्कृतीचे जतन व्हावे, समाजात जनजागृती होवून समाज संघटीत व्हावा, राष्ट्रभक्तीची भावना वाढीस लागावी अशा महान उद्देशाने स्वर्गीय लोकमान्य टिळक यांनी श्री गणेश उत्सवाला सार्वजनिक स्वरुप देवून महाराष्ट्राला व राष्ट्राला एक विधायक उत्सव परंपरा सुरु करुन दिली. आज जरी गणेश उत्सवाचे स्वरुप ग्लॅमरचे झाले असले तरी लोकमान्य टिळकांना अभिप्रेत असणारा व त्यांच्या विचारांच्या आदर्शावर साजरा होणारा गणेश उत्सव म्हणजे नाशिक जिल्ह्यातील मनमाड शहरातील श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्टतर्फे साजरा केला जातो. सामाजिक उदबोधन ,विधायक समाजसेवा, प्रखर राष्ट्रभक्ती आणि भारतीय संस्कृती धर्मजागृती अशा चार स्तंभावर आधारीत हा श्री निलमणी गणेश मंडळाचा उत्सव 1997 सालापासून सातत्याने चर्चेत राहिला आहे. ‼️आम्ही परंपरा पाळतो….❗आम्ही संस्कृतीचे रक्षण करतो…. ‼️हे ब्रिद वाक्य घेवून काम करणाऱ्या या मंडळा द्वारे धार्मिक, सामाजीक, आरोग्य,क्रीडा,सांस्कृतिक, सेवा उपक्रम, शैक्षणिक, पर्यावरण स्तरांवर विविध कार्यक्रमांचे आयोजन सातत्याने करण्यात येते नाशिक जिल्ह्यातील सांस्कृतिक व धार्मिक परंपरेत एक मानाचे स्थान प्राप्त केले आहे.आजच्या आधुनिक काळातील सोशलमीडियाच्या स्पर्धेत देखील श्री निलमणी गणेश मंडळ मागे नाही फेसबुकवर ❗श्री निलमणी गणेश मंदिर मनमाड❗या नावाने पेज(पृष्ठ)उघण्यात आले असून सुमारे 2000 पेक्ष्या जास्त गणेश भक्तांना ट्रस्ट तर्फे राबविण्यात येणाऱ्या/ आलेल्या उपक्रमान च्या माहिती सह विविध धार्मिक कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण ट्रस्ट द्वारे कऱण्यात येते मनमाड शहराच्या वेशीतील अतिप्राचीन श्री निलमणी गणेश मंदीराचा जिर्णोध्दार शहरात 1986 पासून देशभक्ती व धर्मभक्तीचे कार्य करणार्‍या ओम मित्र मंडळाच्या नितीन पांडे, , शेखर पांगुळ, किशोर गुजराथी, प्रज्ञेश खांदाट,गोविंद रसाळ,नारायण फुलवाणी, भिकाजी कुलकर्णी ,स्वर्गीय कृष्णा शिंपी, स्वर्गीय प्रशांत कुलकर्णी या तरुणांनी एकत्र येवून पुढाकार घेऊन 1996 ला सुरू करून 1997 साली पूर्ण केला. आणि त्यानंतर या मंदीरात विविध सार्वजनिक उत्सवांना सुरुवात झाली ती आजतागायत सलग 28 वर्षे सुरु आहे.ऐच्छिक वर्गणीद्वारे साजरा होणारा व लोकमान्यांना अभिप्रेत असणारा पारंपारिक पध्दतीचा उत्सव या गणेश मंडळातर्फे साजरा होतो. या उत्सवाची कार्यक्रम पत्रिका छापण्यात येते. ❗श्री गणेश चतुर्थीला स्थापना व अनंत चतुर्दशीला विसर्जन साठी ❗पारंपरिक लाकडी पालखीतून श्री निलमणीच्या पार्थिव गणेश मुर्तीची सवाद्य मिरवणुक निघते.ह्या दोन्ही मिरवणुका सकाळी काढण्यात येतात मनमाड शहारा मध्ये सकाळी मिरवणूक काढण्या च्या परंपरे चा शुभारंभ श्री निलमणी गणेश मंडळ द्वारे 1997साली करण्यात आला ही परंपरा अखंडपणे आजही सुरु आहे या मिरवणुकीत पारंपारिक वाद्यपथके सनई चौघडा, ढोल, ताशा, तुतारी, भेर, वाद्यवृंद(बॅण्ड), लेझीम पथक, विविध आदिवासी नृत्य, ऐतिहासिक परंपरेचे दर्शन घडविणारे दांडपट्टा, लाठ्याकाठ्या तलवारबाजी, बनाटी या मर्दानी खेळांचे प्रात्यक्षिके, मल्लखांब पथक, महाराष्ट्राची परंपरा सांगणारे वाघ्या मुरळी, भारतीय संस्कृती इतिहास धार्मिकता, देशभक्ती, समाजप्रबोधन व संस्कृती रक्षण यांचे दर्शन घडविणारे जिवंत देखावे मिरवणुकीत पर्यावरण , प्रदूषण ,स्त्री भ्रूण हत्या अश्या सामाजिक बाबतीत प्रबोधन असतात. ❗मिरवणुकीत गुलालाचा वापर नसतो. ❗नाचणे हा प्रकार देखील नसतो तर या मिरवणुकीत सर्व गणेशभक्तांना भगव्या टोप्या व पुणेरी पगड्या घातलेल्या असतात. तर शिवकालीन पध्दतीने मिरवणुकीची दवंडी घोड्यावर बसून देण्यात येते. मिरवणुकीत धार्मिक व देशभक्तीपर घोषणा दिल्या जातात. मिरवणुक मार्गावर सुशोभित रांगोळी काढण्यात येते. तर ठिकठिकाणी सुहासिनींद्वारे पार्थिव निलमणींना औक्षण करण्यात येते. पंचांग तिथी प्रमाणे 10,11 किंवा 12 दिवस असणार्‍या गणेश उत्सवात मंदीरात महाअभिषेक, महाआरती , स्त्रोत्रपठण ❗सार्वजनिक अथर्वशीर्ष पठण❗, महाप्रसाद, गणेश याग, सत्यविनायक महापूजा, अन्नपूर्णा महासेवा छपन्न भोग अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन संपुर्ण धार्मिक सोवळ्यात पंचांग मुहूर्त बघून मान्यवर पुरोहितांच्या हस्ते करण्यात येते. या गणेश उत्सवाबरोबरच श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक मंडळातर्फे गेल्या 28 वर्षात सर्व गणेश भक्तांच्या सहकार्य ने विविध धार्मिक, सामाजिक उपक्रम राबविले जातात. ते खालीलप्रमाणे

❗श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक मंडळातर्फे मनमाड शहरात व परिसरात राबविण्यात आलेले विविध सामाजिक धार्मिक उपक्रम❗

‼️1️⃣‼️ 2001 साली मनमाड शहरात असणार्‍या हिंदू, जैन, शिख, बौध्द यांच्या अमरधाम या पवित्र स्मशानभूमीची श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक मंडळातर्फे नुतनीकरण व दुरुस्ती करण्यात आली.

‼️2️⃣‼️ मनमाड शहरात प्रथमच चैत्र शुध्द प्रतिपदा गुढीपाडवा या हिंदू नववर्षाचे स्वागत करण्यासाठी पाडवा पहाट या कार्यक्रमाची परंपरा ❗2006 ❗साली सुरु करण्यात आली आणि ती आजतागायत जपली आहे

‼️3️⃣‼️ हिंदू नववर्ष (गुढीपाडवा) या दिवशी पाडवा पहाट कार्यक्रमाची सकाळी सांगता झाल्यावर तेथूनच पाडवा पहाट स्वागत यात्रेचे मिरवणुकीचे यशस्वी आयोजन 2006 ते 2009 या कालावधीत मंडळातर्फे करण्यात आले

‼️4️⃣‼️भारताचा अविभाज्य अंग असणार्‍या काश्मिर मध्ये देशद्रोही दहशतवाद्यांच्या हल्ल्यात मारले गेलेल्या निरपराध नागरिकांच्या अनाथ मुलांचा महाराष्ट्रात प्रथम प्रवास झाला त्यावेळी श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक मंडळातर्फे त्यांच्या भव्य स्वागत करुन त्यांना भरघोस अशी आर्थिक मदत करण्यात आली.

‼️5️⃣‼️ त्र्यंबकेश्‍वर येथे महाराष्ट्रातील व देशातील आत्महत्या केलेल्या शेतकरी बांधवांच्या अनाथ मुलांकरीता आधारआश्रम नावाचा प्रकल्प सुरु आहे. 2013 साली भाद्रपद सार्वजनिक महागणेश उत्सवात या अनाथ मुलांना आमंत्रित करुन त्यांना गणेश उत्सवाचा आनंद देत मंडळातर्फे भरघोस आर्थिक मदत करण्यात आली.

‼️6️⃣ ‼️हिंदू धर्मातील पवित्र सण गुढीपाडवा या दिवशी गुढीबरोबर विजयी ध्वज (धर्मध्वज) लावण्यात येतो. 2013 सालापासून श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक मंडळातर्फे मनमाड शहरात सुमारे 5000 पेक्षा जास्त या धर्मध्वजाचे गुढीबरोबर लावण्यासाठी मोफत वाटप करण्याची परंपरा सुरु झाली. ती आजही सुरु आहे.

‼️ 7️⃣‼️सप्टेंबर 2014 मध्ये जम्मु काश्मिर मध्ये मोठ्या प्रमाणात पुर आला. आणि मोठे नुकसान झाले. या वेळी श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक मंडळ व ओम मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने 600 रुपये प्रति किंमत असणारी 100 ब्लँकेट येथील पुरग्रस्त देशबांधवांना पाठविण्यात आली.

‼️8️⃣‼️ भारतात 1000 पुरुषांमागे 927 स्त्रीयांचे प्रमाण आहे. यामुळे समाजातील सामाजिक समतोल बिघडला आहे. आणि स्त्रीभ्रुणहत्येमुळे हाच बिघडलेला समतोल आणखी वाढत आहे. म्हणून समाजातील जन्म घेणार्‍या कन्या संरक्षणाच्या व समृध्दीच्या चळवळीस बळ मिळावे म्हणून श्री निलमणी गणेश मंडळातर्फे ❗श्री गणेश जयंती❗ या गणेशाच्या जन्मदिनी जन्माला येणार्‍या कन्येस रुपये 1100 रुपयांची 10 वर्षे मुदतीची कन्या सुरक्षा ठेव देण्याचा उपक्रम जानेवारी 2015 ला सुरु करण्यात आला.हा अभिनव उपक्रम आजही सुरू आहे

‼️9️⃣‼️ श्री निलमणी गणेश मंडळ व ओम मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने दि.13 जुलै 2015 रोजी नाशिक येथे सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त पुरोहित संघातर्फे काढण्यात आलेल्या सिंहस्थ कुंभमेळा शुभारंभ मिरवणुकीत रांगोळी सेवा देण्यात आली. ह्या महा कुंभमेळा मध्ये अशी सेवा देण्याचा मान प्रथमच मंडळला मिळाला

‼️🔟‼️नाशिक व त्र्यंबकेश्‍वर येथे होणार्‍या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी लाखोंच्या संख्येने भाविक मनमाड रेल्वे स्थानकावर येत असतात. यातील आजारी, वृध्द व अपंग महिला भाविक प्रवाशांकरीता श्री निलमणी गणेश मंडळातर्फे रुपये 8000 किंमतीची व्हीलचेअर समर्पित करण्यात आली. ही व्हिलचेअर सर्व स्तरातील प्रवाशी मोफत वापर करत आहेत आता पर्यंत सहा वर्षात शेकडो प्रवाश्यांनी या मोफत सेवेचा लाभ घेतला आहे

‼️11‼️ श्री सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक लोकमान्य टिळक यांच्या 160 व्या जयंती वर्ष उत्सव निमित्त शालेय विद्यार्थ्यांनी ज्या लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवचा आरंभ केला त्यांची माहिती व्हावी त्यांची संपूर्ण माहिती देणारे 10 हजार पत्रके निलमणी गणेश मंदीर ट्रस्टतर्फे सन 2016 च्या भाद्रपद गणेशोत्सवात मनमाड शहरातील 18 माध्यमिक व 20 प्राथमिक शाळांमध्ये वितरीत करण्यात आली.

‼️12‼️सन 2016च्याच भाद्रपद गणेशोत्सवात केंद्रसरकारच्या बेटी बचाव-बेटी पढाव (मुलगी वाचवा-मुलगी शिकवा) या अभियानाला बळ देण्यासाठी निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक मंदीर ट्रस्टतर्फे बेटी बचाव-बेटी पढाव या उपक्रमाला बळ देणार्‍या माहितीचे शंभर डिजीटल बॅनर मंदीर परिसरात लावण्यात आले होते. त्यांतून स्री भ्रूण हत्ये संबंधित प्रबोधन करण्यात आले होते

‼️13‼️ सन 2016च्या गणेशोत्सवानिमित्त महाराष्ट्र राज्यशासनाच्या सांस्कृतिक विभागाने लोकमान्य महोत्सवाअंतर्गत आयोजित केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव सजावट स्पर्धेत बेटी बचाव-बेटी पढाव आणि लोकमान्यांची महती सांगणारी 10 हजार पत्रके वाटल्याचा उपक्रम राबविल्याबद्दल श्री निलमणी गणेश मंडळास रोख रु.15,000/- व मानपत्र आणि आकर्षक स्मृतिचिन्ह असा नासिकजिल्हास्तरीय द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार मंडळाला मिळाला आहे.

‼️14‼️ मनमाड शहरात धार्मिक कार्यात अग्रेसर असल्याने धर्म कार्याची जाणीव ठेवून शहरातीलच श्री.सिताराम पांडुरंग शेळके व सौ.कलावती सिताराम शेळके या सलग दरमहा 216 वेळेस पंढरपूरची वारी करणार्‍या श्रध्देय दाम्पत्याचा दासबोध /ज्ञानेश्वरी ग्रंथ देवून ट्रस्ट बहुमान करण्यात आला. धार्मिक परंपरेला बळ मिळावे म्हणून ट्रस्ट तर्फे हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला
‼️15‼️सन 2017 मध्ये भाद्रपद महागणपती उत्सवा मध्ये श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे ❗औषध संकलन केंद्र❗या अभिनव सामाजिक उपक्रम ची सुरुवात करण्यात आली याला मनमाड शहरातील नागरिकांनी उस्फूर्त दिला आहे आजही सलग 08 वर्षी हा उपक्रम सुरु आहे सलग 07 वर्षांत मंडळाने सुमारे 1,00,000/- पेक्षा जास्त किमतीची औषधे जनकल्याण समितीच्या माध्यमातून गरजू रुग्णा ना मोफत वितरित केली आहेत ‼️16‼️ऑक्टोबर 2018 मध्ये 1997 पासून मनमाड शहरात सार्वजनिक गणेशोत्सव मध्ये स्थापना आणि विसर्जन अश्या दोन्ही मिरवणुका सकाळी काढण्याची परंपरा सुरू केली आणि अखंडपणे 28 वर्ष सुरु ठेवली म्हणून मनमाड शहर पोलीस स्थानका तर्फे मंडळा चा गौरव करण्यात आला ‼️17‼️सन 2018 च्या विसर्जन मिरवणुकीत बेटी बचाव बेटी पढाव तसेच राष्ट्रीय पोषण आहार अभियान अंतर्गत 70 पेक्षा जास्त अंगणवाडी शिक्षिकां नी सामाजिक प्रबोधन केले ‼️18‼️सन 2017 मध्ये मंडळा तर्फे राबविण्यात आलेल्या अभिनव औषध संकलन केंद्र या उपक्रमाला व शिस्तबद्ध मिरवणूक आयोजन म्हणून श्री निलमणी गणेश मंडळ ला मनमाड पोलिस उपविभागीय स्तर वर प्रथम पारितोषिक देऊन गौरविण्यात आले आहे ‼️19‼️ सन 2018 मध्ये देखील सलग तिसऱ्या वर्षी शिस्तबद्ध मिरवणुका, उत्तम धार्मिक नियोजन , आणि प्रबोधन पर सामाजीक उपक्रम म्हणून श्री निलमणी गणेश मंडळ ला नासिक ग्रामीण पोलिस विभागातील मनमाड उपविभाग स्तर वर प्रथम पारितोषिक मिळाले आहे ‼️20‼️ सन 2019 च्या भाद्रपद महागणपती उत्सवात मंडळा तर्फे पर्यावरण संरक्षण व्हावे, पृथ्वी ला प्लॅस्टिक पासून वाचवावे म्हणून ❗प्लॅस्टिक बंदी ❗ या विषयावर सुमारे 30 उत्कृष्ट मराठी भाषेतील घोष वाक्य चे डिजिटल बॅनर ,कागदी पत्रक द्वारे आणि मिरवणुकीत सामाजिक प्रबोधन होईल असा उपक्रम राबविण्यात आला या वर्षी ही मंडळाला वरील पर्यावरण प्रबोधन उपक्रम आणि शिस्तबद्ध मिरवणुका म्हणून सलग चौथ्या वर्षी ही मनमाड पोलिस उपविभागात मंडळा प्रथम पारितोषिक मिळाले आहे‼️21‼️मार्च 2020 पासून सुरु झालेल्या कोविड -19 संकट काळात श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे सर्व कायदेशीर व सामाजीक जबाबदारी चे काटेकोर पालन करण्यात आले या संकट काळात आपली राष्ट्रीय व सामाजिक जबाबदारी पूर्ण करत श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे रुपये 51521/- ( एक्कावन्न हजार पाचशे एकवीस) इतका भरघोस रक्कम निधी देशाच्या➖️ पंतप्रधान मदत निधी कोषा ➖️मध्ये देण्यात आला ‼️22‼️कोविड संकट काळात आलेल्या 2020 मधील दिवाळी मध्ये श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब आणि गरजू देश बांधवांना मदत म्हणून ❗एक दिवाळी आनंदाची❗ हा सेवा उपक्रम राबविण्यात आला याअंतर्गत सुमारे 1000 पेक्षा जास्त गरीब बांधवांना सुमारे 01 लाख रुपये किमती ची दीपावली चे फराळ पाकिटे मोफत देण्यात आली‼️23‼️ आम्ही परंपरा पाळतो आम्ही संस्कृती चे रक्षण करतो हे ब्रीद वाक्य ला सार्थ ठरवत धार्मिक जबाबदारी पाळत श्री क्षेत्र अयोध्या येथे सर्व विश्वा तील हिंदू चे परम आराध्यदैवत मर्यादा पुरूषोत्तम भगवान प्रभू श्री रामचंद्र यांचे जन्मभूमी वर निर्माण होणाऱ्या भव्य श्री राम मंदीर उभारणी साठी ट्रस्ट तर्फे रुपये 5100 /- इतका निधी समर्पित करण्यात आला ‼️24‼️सामाजिक बांधिलकी जपत श्री निलमणी गणेश मंडळाने 2017 पासून आठ वर्षात रुपये 100000/- रुपये पेक्षा जास्त औषधे संकलित करून आदिवासी भागात मोफत दिली ❗❗️25❗️❗मनमाड शहर चे मुख्य प्रवेशद्वार (वेश) नूतनीकरण (जीर्णोद्धार )निर्माण कार्यात श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट चे महत्वपूर्ण योगदान राहिले आहे ❗26❗मनमाड शहरात नगर परिषद द्वारे कायम स्वरुपी निर्माल्य संकलन केंद्र उभारले जावे यासाठी ट्रस्ट आग्रही आहे i➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
❗➖️नितीन पुष्पकांत पांडे➖️❗️

विश्‍वस्त सचिव , श्री निलमणी गणेश मंडळ,मनमाड

152, वीर सावरकर नगर,सावरकर जिमखान्याजवळ,मनमाड 423104 जि.नाशिक

भ्रमणध्वनी क्र. 9422756716, 8668954060

ई-मेल आय.डी. nitinpande6716@gmail.com pandenitin6716@gmail.com


अजून बातम्या वाचा..

.