भारतीय जनता पक्ष राजकारण करीत असताना सामाजिक बांधिलकी जपत विविध समाजपयोगी उपक्रम राबवित असते याच अंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी -एक पेड माँ के नाम – हा उपक्रमा मध्ये प्रत्येक भारतीय नागरिकांनी आपले आई साठी किंवा आईचे स्मरण म्हणून एक वृक्ष लावावा असे अभियान सध्या देशात सुरु केले आहे या नुसार मनमाड शहर भाजपा मंडला च्या वतीने स्वर्गीय टेहेलराम फुलवाणी नगर या नवीन साकारणाऱ्या लोक वस्ती मध्ये हा अभिनव उपक्रम घेतला भाजपा नेते व माजी नगराध्यक्ष नारायण फुलवाणी, भाजपा नाशिक जिल्हा उपाध्यक्ष नितीन पांडे यांचे शुभ हस्ते प्रतिनिधिक स्वरूपात वृक्षारोपण करून या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला या वेळी भाजपा चे नरेश फुलवाणी, भाजपा नाशिक जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार फुलवाणी, जिल्हा उपाध्यक्ष नारायण पवार, निवडणूक प्रमुख पंकज खताळ, भाजपा मनमाड शहर अध्यक्ष संदीप नरवडे, भाजपा जिल्हा चिटणीस एकनाथ बोडखे, योगेश चुनियान,नितीन परदेशी भाजपा शहर सरचिटणीस आनंद काकडे,भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष अकबर शहा, सुमेर मिसर,भाजपा व्यापारी आघाडी जिल्हा अध्यक्ष कांतीलाल लुणावत, भाजपा जेष्ठ नीलकंठ त्रिभुवन भाजपा दिव्यांग आघाडी जिल्हा उपाध्यक्ष सुनीता वानखेडे भाजपा दीपक पगारे भाजपा शहर उपाध्यक्ष गजू कासार, कैलास देवरे,भाजपा युवा मोर्चा शहर अध्यक्ष मुकुंद एळींजे , तिलोक संकलेचा, मुकेश वेलेन्नू,आदी भाजपा पदाधिकाऱ्यां सह कालू शेठ लालवानी, हरीश मेहानी, डॉ शरद शिंदे माजी नगरसेवक, नोतनदास फुलवाणी, कमलाकर खरोटे, विलास कासार, सुभाष आव्हाड, महेश लालवानी, राजाभाऊ गायकवाड,प्रमोद जोशी, अंबु तेजवानी, माणिक दौलानी,दिगंबर जाधव, , पप्पू बाकलीवाल, राम फुलवाणी,, मकरंद कुलकर्णी, आदी प्रमुख मान्यवर व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित सर्वच मान्यवराच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले भाजपा चे जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार फुलवाणी व त्यांचे परिवाराने ही वृक्ष संगोपन करण्याची जबाबदारी स्वीकारली तर भाजपा जिल्हा उपाध्यक्ष नितीन पांडे यांनी या एक पेड माँ के नाम या उपक्रमाची माहिती सांगितली यावेळी बेल, शमी, नारळ, पाम ट्री, वड, अशोका सह विविध 105 वृक्षा चे रोपण करण्यात आले एवढ्या मोठ्या प्रमाणात भाजपा ने केलेल्या वृक्षारोपण कार्यक्रमा संयोजन भाजपा नाशिक जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार फुलवाणी, नरेश फुलवाणी भाजपा मनमाड शहर अध्यक्ष संदीप नरवडे यांनी केले