सुवा फिजी येथे १४ ते २१ सप्टेंबर २०१४ रोजी होणाऱ्या कॉमनवेल्थ चँपियनशिप साठी महाराष्ट्रातील एकमेव आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग प्रशिक्षक तृप्ती शेखर पाराशर यांची सलग आठव्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारतीय संघाचे प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे
आंतरराष्ट्रीय खेळाडू आकांक्षा किशोर व्यवहारे साईराज राजेश परदेशी या दोघांचीही भारतीय संघात निवड करण्यात आली असून एकाच वेळेस मनमाड शहरातील प्रशिक्षक व खेळाडूंची भारतीय संघात निवड होणे ही समस्त मनमाड करांसाठी अतिशय अभिमानास्पद बाब आहे
यशस्वी खेळाडूना छत्रे विद्यालयाचे क्रीडा प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे यांचे मार्गदर्शन लाभले आहे
जय भवानी व्यायामशाळेचे अध्यक्ष डॉ विजय पाटील मोहन अण्णा गायकवाड डॉ सुनील बागरेचा प्रा दत्ता शिंपी छत्रे विद्यालयाचे अध्यक्ष पी जे दिंडोरकर सचिव दिनेश धारवाडकर संचालक नाना कुलकर्णी प्रसाद पंचवाघ मुख्याध्यापक आर एन थोरात उपमुख्याध्यापक संदीप देशपांडे पर्यवेक्षिका सौ पोतदार महाराष्ट्र वेटलिफ्टिंग संघटनेचे सचिव संतोष सिंहासने अध्यक्ष सुधीर म्हाळसकर यांनी अभिनंदन केले व स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या

मस्तानी अम्मा उर्स कमिटी 2025 नांदगाव चे अध्यक्षपदी अय्याज शेख यांची निवड
आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली मस्तानी अम्मा उर्स कमिटी 2025 नांदगाव चे...