मनमाड: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या पदव्युत्तर हिंदी विभागातर्फे १४ सेप्टेंबर हा दिवस “हिंदी दिवस समारोह “म्हणून साजरा करण्यात आला.या कार्यक्रमासाठी मनमाड येथिल छत्रे न्यु इंग्लिश स्कूलचे शिक्षक श्री.राजेंद्र जगताप उपस्थित होते.हिंदी भाषा ही केवळ भारतीय भाषा नाही तर ती विश्व भाषा म्हणून लौकिक पावत आहे.हिंदी मध्ये रोजगाराच्या अपार संधी उपलब्ध आहेत.आजच्या युवकानी संधी ओळखून त्याचे सोने केले पाहिजे असे मत व्यक्त कले.ते पुढे म्हणाले की आपल्याला जर हिंदी भाषा येत असेल तर देशाच्या कुठल्याही राज्यात आपल्याला कोणतीच अड़चन येत नाही असे उद्गार काढले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुभाष निकम यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष व महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.बी.एस.देसले यांनी हिंदी भाषेचे महत्व विद्यार्थ्याना सांगितले.हिंदी भाषेचे साहित्य समृद्ध करण्यात कबीर, सूरदास तुलसीदास, मीराबाई आणि आधुनिक काळातील साहित्यकारांचे योगदान अविस्मरणीय आहे असे मत व्यक्त केले .
कार्यक्रमाचे प्रास्ताविक हिंदी विभाग प्रमुख डॉ. आर.एन.वाकळे यानी केले.
आपल्या प्रास्ताविकपर व्याख्यानात त्यांनी हिंदी दिवसाचे महत्त्व सांगत असताना हिंदी भाषेतून रोजगाराच्या संधी उपलब्ध असल्याचे उदाहरणासह विशद केले. प्रमुख पाहुण्याचा परिचय प्रा. डॉ. विष्णु राठोड़ यानी करून दिला.या कार्यक्रमा प्रसंगी हिंदी विभागातील विद्यार्थी प्रज्वल गुंड, विवेक संसारे,प्रतिक्षा झाल्टे,जालिंदर बोरसे, वैष्णवी गुंड, सपना एंडाइत, शुभांगी पगार इत्यादी विद्यार्थ्यांनी हिंदी भाषेविषयी आपले मत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन द्वितीय वर्षाची विद्यार्थीनी ॠतुजा जाधव यांना केले तर आभार प्रदर्शन हिंदी विभागाची विद्यार्थीनी शुभांगी पगार हिने केले.याप्रसंगी महाविद्यालयाचे शैक्षणिक पर्यवेक्षक प्रा.डी.व्ही.सोनवणे,डॉ.आर.डी.भोसले, प्रा. कविता काखंडकी , डॉ.शिवाजी थोरे, ग्रंथपाल डॉ.राहुल लोखंडे, डॉ.पी.टी.वानखेडे, डॉ.सुनिल घुगे, डॉ.सोमनाथ पावडे, डॉ.राजाराम जाधव प्रा.शरद वाघ, कुलसचिव श्री.समाधान केदारे सर्व विभागाचे शिक्षक, कार्यालयीन कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्राची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.यानंतर ग्रंथालय विभागाद्वारे ग्रंथ प्रदर्शन भरवण्यात आहे.या प्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, प्रध्यापक व विद्यार्थ्यांनी प्रचंड प्रतिसाद दिला.

राशी भविष्य : ०८ ऑक्टोबर २०२५ – बुधवार
मेष : आपल्या मतांविषयी आग्रही राहाल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. वृषभ : महत्त्वाची कामे...