loader image

नाशिक जिल्हा बँकेने ९ कर्जदारांना बजावल्या अंतीम जप्तीच्या नोटीसा; थकबाकीदारांमध्ये भीतीचे वातावरण ?

Sep 14, 2024


नांदगाव : मारुती जगधने
नांदगांव तालुक्यातील जिल्हा बँकेचे कर्ज घेतलेल्या व थकित झालेल्या ९ शेतकर्याना त्याची मालमत्ता जप्तीच्या अंतीम नोटिसा जिल्हा बँकेने बजावल्याने शेतकर्यांचे धाबे दणाणले आहे.बँकेने मुदतवाढ दिल्यास शेतकर्याना कर्ज फेड करण्यास तरतुद करता येऊ शकते .बँकेने अंतीम नोटिसा
बजावल्या असल्याने शेतकरी वर्गात आता काय व कसे कर्ज भरावे या बाबत संपूर्ण कुटुंब संभ्रमात पडले आहे. आता जगावे की मरावे असा प्रश्न या कुटंबाना सतावत आहे ❓नांदगाव तालुका अवर्षनग्रस्त तालुका म्हणुन ओळख आहे सन २००९ मध्ये नांदगाव तालुक्यात महापूर आला होता त्यात अनेकांच्या जमिनी व घरे वाहून गेली याच काळात पिंपरखेड येथील एका शेतकरी महिलेने आत्महत्या केली होती या काळात तालुक्यात जवळपास १६ शेतकर्यांनी कर्जबाजारीपणा मुळे व नापिकीने आपले जीवन संपविलेले काही शेतकर्यांनी विष घेऊन तर काहीनी गळफास घेतली होती तालुक्याने प्रचंड प्रमाणात आसमानी व सुलतानी संकटे सोसली आहे आता त्यातच काही वर्षापासून असलेला दुष्काळ गारपिट,नापीकी, अतिवृष्टीने शेतकरी मेटाकुटीला आला असताना शेतकर्यावर बँकेने अंतीम जप्तीच्या नोटिसा बजावल्याने ९ कुटुंबीय टेन्शन मध्ये आले आहेत.दि ११/१०/२०२४ रोजी थकबाकीदारांच्या मिळकतीचा जाहीर लिलाव होणार आल्याचे जाहीर नोटीस म्ध्ये सांगितले आहे.
दरम्यान नांदगांव
तालुक्यातील थकीत शेतकरी मुद्दल व व्याज धरुन असलेली बँकेची थकीत रकमेसह नोटिसा बजावण्यात आल्या आहेत हे सर्व शेतकरी नांदगांव तालुक्यातील आहेत .१) सरस्वतीबाई लहिरे रा. भालुर ८ लाख ७० हजार, थकीत सन १४ मध्ये कर्ज घेतले,२)भिमा मोरे मुळडोंगरी सन १४ मधील थकीत रु १४ लाख, ३)दगेसिंह राजपुत्र बोराळे सन १४ मधील कर्ज थकीत ४२ लाख रु,४) भगीरथीबाई पाटील वाडाळी सन १९ मधील ४५ लाख रु, ५)तात्याबा जाधव मनमाड सन १९ थकीत ५ लाख ३१ ह .रु.६)अशोक निकम वंजारवाडी ८लाख ९१ ह रु,७) दुर्याधन/ सुनंदा कदम रा.पांझन देव सन १४ मधील थकीत २८ लाख रु,८) सुधीर मिसर. रा.माळेगांव सन १९ मधील थकित ५ लाख रु,९)रवींद्र मिसर सन १९ मधील थकित ५ लाख रु

आदीना अंतीम नोटीस व जप्तीची अंतीम नोटीस बजावण्यात आली आहे .या नोटीसमुळे शेतकरी कुटुंब तान तनावा खाली आले आहे.बँकेने सर्व नियम अटी ची पूर्तता करुन या नोटिसा बजावल्या आहेत . शिवाय या कर्जदाराना त्यांच्या मालमत्ता संदर्भात सुचना देऊन नोटीस बजावल्या यात आनेक कर्जदारानी काही प्रमाणात कर्जाचे हाप्ते भरले असून ते भरलेले हाप्ते बँकेने कर्जात वर्ग केले आहेत. या बाबत पाटील कुटुंबातील तक्रारी वरुन
१५ लाख रूपयाचे घेतलेले कर्ज मुदतीत भरले नाही म्हणुन शेतकर्याच्या मालमत्तेवर नाशिक जिल्हा बँकेने जप्तीची कारवाई ची तरतुद केली असल्याने सदर शेतकर्यासह संपूर्ण कुटुंब ञस्त होऊन आत्महत्या करण्याचा विचार करीत आहे ? दि.
नांदगांव ११/१०/२४ रोजी जप्तीची कारवाई होणार असल्याची नोटंीस पुन्हा आली .
– तालुक्यातील वडाळी बु!! येथील शेतकरी कुटुंबातील शेतकरी पुत्र सोमनाथ साहेबराव पाटील यांनी थेट मुख्यमंत्री कार्यालयात निवेदनाद्वारे नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नांदगाव शाखा अधिकारी, पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या कुटुंबाला दिलेल्या धमक्याबाबत व काही कागदपत्रांवर जबरदस्तीने घेतलेल्या सह्याबाबत एक व्यथाच मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मांडलेली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, नांदगाव तालुक्यातील सोमनाथ पाटील यांच्या आजी भागीरथीबाई गुलाब पाटील व चुलते भागवत बद्रीनाथ पाटील यांनी 2013 मध्ये फार्म हाऊस साठी 1500000 ₹ कर्ज घेतले होते. त्यासाठी नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा नांदगाव यांना शेत जमिनीचे काही कागदपत्र ताराण दिले होते. परंतु सतत चे अस्मानी संकट, दुष्काळ, अतिवृष्टी आदी कारणास्तव सदर कर्ज परतफेड करता आले नाही. याबाबत बँकेने वेळोवेळी दिलेल्या नोटिसांवर सोमनाथ पाटील यांच्या कुटुंबातील त्यांच्या आजी व चुलते यांच्या जबरदस्तीने व धमकावून सह्या घेतल्या होत्या.असा आरोप निवेदनात केला आहे. तसेच 30 जुलै 2024 रोजी एका जिल्हा दैनिकात जाहिरात देवून सदर फार्म हाऊस साठी तारण दिलेल्या जमिनीचे लिलाव करण्याचे कारस्थान रचून दि. 8/8/2024 रोजी जमिनीचा लिलाव करुन कर्ज वसुली करण्याचे ठरवले होते. परंतु याबाबत बँकेने पाटील यांच्या आजी व चुलते (कर्जदार) यांना जमीन लिलावाबाबत कुठलीही सूचना दिलेली नव्हती. त्यामुळे परस्पर लिलाव तारखेच्या दोन-चार दिवस अगोदर गावातील एका व्यक्तीने त्यांना पेपर मधील जाहिरात बाबत सांगितल्यानंतर सदर बाबतीत पाटील यांच्या कुटुंबाला माहिती मिळाली. त्यानंतर सोमनाथ पाटील यांनी दिनांक 7/8/ 2024 रोजी मुख्यमंत्री व संबंधित कार्यालयाकडे अर्जफाटे करुन जमीन लीलाव प्रक्रिया थांबवण्यात यावी म्हणून बेमुदत उपोषणाचा मार्ग अवलंबला होता. तुर्तास दिनांक 8/8/ 2024 रोजी सकाळी उपोषणाच्या अगोदर 2,00000 लाख भरणा करुन जप्ती प्रक्रिया थांबवण्याबाबत बँकेला रीतसर अर्ज देऊन विनंती केली होती. तसेच बँकेनेही सदर जप्ती प्रक्रिया थांबवून 2 लाख रुपये स्वीकारले परंतु ते व्याजामध्ये वळवले तशी पावती बँकेने दिली होती. परंतु उर्वरित कर्ज आम्ही लगेचच 2 महिन्यातच भरतो. किंवा 30 सप्टेंबर 2024 पर्यंत भरतो. असे तोंडी किंवा लेखी जबाब दिले नव्हते. तरीही बँकेच्या पदाधिकाऱ्यांनी धमक्या देऊन माझ्या कुटुंबातील माझ्यासह माझी आजी व चुलते यांच्या जबरदस्तीने काही कागदपत्रांवर तसेच मुख्यमंत्र्यांच्या नावे दिलेले अर्ज निकाली काढणे बाबत सह्या व अंगठ्याचे ठसे घेतल्यामुळे माझ्यासह माझे कुटुंबीय भयभीत झाले असून भीतीच्या वातावरणात वावरत आहे. असे पाटील यांचे म्हणणे आहे. यास्तव पुन्हा दि. 10/9/2024 ला निवेदनाद्वारे कळविलेले आहे. त्यात आम्ही फार्म हाऊस साठी घेतलेले 15,00000 लाख उत्पन्नाच्या स्रोतानुसार टप्प्याटप्प्याने भरण्यास तयार असून आम्ही दिनांक 8/8/2024 रोजी भरणा केलेली 2,00000 लाख रक्कम व्याजात न वळवता मुद्दल मध्ये वळवावी. तसेच बँकेने व्याजात संपूर्ण सूट द्यावी. व मुद्दल चे 15 लाख टप्प्याटप्प्याने उत्पन्नाच्या स्त्रोतानुसार भरण्यास मुभा द्यावी. असे सोमनाथ पाटील यांचे म्हणणे आहे. अन्यथा आम्हाला बेमुदत / प्राणांतिक उपोषणासारखा मार्ग अवलंबवा लागेल. तसेच सदर प्रकरणी बँक पदाधिकाऱ्यांच्या अशा प्रकारामुळे व धमकावन्यामुळे घरातील व्यक्तींनी डोक्यात टेन्शन घेऊन आत्महत्या केली तर त्यास सर्वस्वी शासन आणि संबंधित पदाधिकारीच जबाबदार राहतील असेही सोमनाथ पाटील यांनी शेवटी म्हटलेले आहे.


अजून बातम्या वाचा..

रोटरी क्लब मनमाड तर्फे पीएम श्री केंद्रीय विद्यालय मध्य रेल्वे मनमाड येथे आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

रोटरी क्लब मनमाड तर्फे पीएम श्री केंद्रीय विद्यालय मध्य रेल्वे मनमाड येथे आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

पीएम श्री केंद्रीय विद्यालय मध्य रेल्वे मनमाड येथे रोटरी क्लब मनमाड व मनमाड शहरातील नामांकित...

read more
मनमाड महाविद्यालयात ‘मराठी वाचन कट्टा’ सुरु  व्यक्तिमत्त्व विकासासाठी विद्यार्थ्यांनी पुस्तकांशी मैत्री करणे आवश्यक आहे  – प्राचार्य डॉ. अरुण पाटील

मनमाड महाविद्यालयात ‘मराठी वाचन कट्टा’ सुरु व्यक्तिमत्त्व विकासासाठी विद्यार्थ्यांनी पुस्तकांशी मैत्री करणे आवश्यक आहे – प्राचार्य डॉ. अरुण पाटील

  मनमाड (नाशिक) – महात्मा गांधी विद्यामंदिर संचालित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात...

read more
पौष मास संकष्ट चतुर्थी निमित्त शुक्रवार दिनांक 17/01/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

पौष मास संकष्ट चतुर्थी निमित्त शुक्रवार दिनांक 17/01/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री...

read more
.