नांदगाव (प्रतिनिधी) नांदगाव येथे आज पहाटे साडेचार च्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. त्यात हनुमान नगर येथील धनाजी केदा गुंजाळ सर यांच्या घरावर या सुमारास वीस पडली त्यामुळे त्यांच्या घरातील सर्व इलेक्ट्रॉनिक वस्तू जळून खाक झाल्या शिवाय सौ संगीता धनाजी गुंजाळ यांच्या पायावर घरातील जळती वायरिंग पडली त्यामुळे त्यांच्या पायाला इजा झाली दैव बलवत्तर म्हणून घरातील इतर कोणालाही इजा झाली नाही व मनुष्यहानी टळली. वीज पडली तेव्हा परिसरात मोठा आवाज झाला आजूबाजूचे परिसरातील लोक जागे झाले व काय झाले हे त्यांना क्षणभर समजले नाही. शिवाय वीज पडल्यामुळे सर्वत्र अंधाराचे साम्राज्य पसरले. गुंजाळ सर व सौ. संगिता गुंजाळ मॅडम हे घाबरून गेले होते. त्यांच्या घरातील संपूर्ण इलेक्ट्रिक वायरिंग, तसेच केबल, टि.व्ही.,फ्रिज, व इतर इलेक्ट्रॉनिक्स वस्तू जळुन गेल्या. शिवाय पलंगावरील गादी जळाली. तर समोर रिहात असलेले शेखर पाटील यांच्या घरातील राउटर,फॅन, टि.व्ही. तर संजय शेवाळे यांचा टि.व्ही. पंकज सोनवणे व गवळी यांचे फॅन व आजुबाजुला इतर इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
या बाबतची माहिती मिळताच तलाठी सिरसाठ तात्या,गिरणानगरचे सरपंच अनिता राहुल पवार, उप सरपंच अनिल म्हसु आहेर,पोलिस पाटील बाळु पाटील,ग्रा.पं.सदस्य वैशाली राजेंद्र कुटे, सचिन आहेर, ॳॅड.उमेश सरोदे,न.पा.चे अंबादास सानप , गिरण्या नगरच्या ग्रामसेविका हिमगौरी आहेर,ग्रा.पं.कर्मचारी राजेंद्र भातकुटे यांनी धनाजी गुंजाळ सर यांच्या घराला भेट देऊन वीज पडुन
झालेल्या नैसर्गिक आपत्तीची पाहाणी केली. व गुंजाळ कुटुंबियांना धिर दिला. यावेळी हनुमान नगर येथील शेखर पाटील, संदिप भदाणे, प्रदिप निकम, प्रा.सुरेश नारायणे, काशिनाथ गवळी सर, लक्ष्मीनगर येथील पी.आर.पाटील,गोरख देसले,संजय शेवाळे, निलेश शिरोडे,संजय देशमुख,नंदू पाटील, पंकज सोनवणे शिरसाट सर, शुभम सरोदे व हनुमान नगर मधील ग्रामस्थांनी भेट देऊन धनाजी गुंजाळ कुटुंबियांवर वीज पडुन आलेल्या नैसर्गिक आपत्तीस धीर दिला.