या विज्ञान प्रदर्शन दालनाचे उद्घाटन सेंट झेवियर हायस्कूलचे मा. मुख्याध्यापक फादर माल्कम यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी शाळेच्या मा.उपमुख्याध्यापिका सिस्टर ज्योत्स्ना,मा. पर्यवेक्षक श्री अनिल निकाळेसर,संत बार्णबा शाळेतील विज्ञान शिक्षक श्री.कमलेश पाटीलसर उपस्थित होते. या विज्ञान प्रदर्शनात जवळपास तिन्ही गट मिळून एकूण 70 उपकरणे ठेवण्यात आलेली होती. या विज्ञान प्रदर्शनाचे परीक्षण संत बार्णबा हायस्कूलचे विज्ञान शिक्षक श्री. कमलेश पाटील सर आणि सेंट झेवियर हायस्कूलचे प्रयोगशाळा सहाय्यक श्री. महेश भोसले सर यांनी परिक्षण केले. प्रदर्शनातील यशस्वी झालेल्या पुढील विद्यार्थ्यांना शाळेचे माननीय मुख्याध्यापक फादर माल्कम, मा.उपमुख्याध्यापिका सिस्टर ज्योत्स्ना,मा.पर्यवेक्षक श्री. अनिल निकाळे सर फादर विवेक आणि फादर लॉईड यांच्या हस्ते पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. विजेत्या मुलांना शाळेतील विज्ञान शिक्षिका सौ.अंजलिना झेवियर यांच्यातर्फे चषके व भेटवस्तू देण्यात आलीत.या प्रदर्शनाचा निकाल पुढीलप्रमाणे-
लहान गट (इयत्ता पाचवी ते सहावी) –
प्रथम- साहील एकनाथ सदगीर
द्वितीय – अनुज दत्तू जाधव
तृतीय – स्वरूप हनुमान सोनवणे
उत्तेजनार्थ – समर्थ दुर्गेश डिंबर
मध्यम गट (इयत्ता सातवी ते आठवी )-
प्रथम -आराध्य निलेश धात्रक
द्वितीय -मयुरी त्रिलोक जाधव,ऋतुजा नानासाहेब जाधव
तृतीय -समृध्दी राजू जगताप
समिक्षा सिद्धार्थ जगताप
उत्तेजनार्थ -साई चंद्रकांत चुंबळकर
मोठा गट (इयत्ता नववी ते दहावी)-
प्रथम- हर्षु चंद्रकांत सांगळे आरती वसंत आहिरे,जान्हवी मोहन सांगळे
द्वितीय- श्रेया ललित घोडके
आम्रपाली राजेंद्र पगारे
तृतीय – मयुर अनिल मुंढे
सुशांत चंद्रकांत धात्रक
उत्तेजनार्थ – निखिल सागर वैद्य,
समर्थ संजय जाधव
पारितोषिक वितरणाचे सूत्रसंचालन श्री प्रकाश नान्नोर सरांनी तर आभार प्रदर्शन श्री. अनिल निकाळे सरांनी केले.या प्रदर्शनास श्री.अजिंक्य जाधव सर ,प्रयोगशाळा परिचर श्री.अरविंद दळवी आणि शाळेतील सर्व विज्ञान शिक्षकांनी सहकार्य केले.

मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार
मनमाड - शहरात गेली 29 वर्ष कार्यरत असलेली व मनमाड शहराची अर्थ वाहिनी असलेल्या प्रगती अर्बन...