loader image

महायुती तर्फे अखेर सुहास कांदे यांना शिवसेनेची उमेदवारी जाहीर

Oct 23, 2024


मनमाड – संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या नांदगाव विधानसभा मतदारसंघात अखेर महायुतीचे सुहास कांदे यांना शिवसेनेची अधिकृत उमेदवारी जाहीर झाल्याने कार्यकर्त्यांनी फटाके फोडून या निर्णयाचे स्वागत केले आहे. राज्यातील हेविवेट नेते आणि अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ हे सुद्धा उमेदवारी मिळविण्यासाठी शद्दू ठोकून होते महायुती कडून आता कांदेंची उमेदवारी जाहीर झाल्याने भुजबळ काय करतात याबाबत अनेक उलट सुलट चर्चा सुरू आहे. महाराष्ट्राच लक्ष लागलेल्या नांदगाव विधानसभा मतदारसंघात काल अखेर सुहास कांदे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल शिवसेनेची पाहिली यादी जाहीर केली या यादीत कांदे यांचा समावेश करण्यात आला आहे त्यांना उमेदवारी मिळू नये यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी थेट देवगिरी बंगला गाठत अजित पवार यांना साकडे घातले होते मात्र त्याचा काहीच फरक पडला नसल्याचे चित्र दिसत आहे आता समीर भुजबळ काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे .नांदगाव तालुक्यातील लढाई आता अत्यंत चुरशीची होणार असुन महाविकास आघाडीच्या वतीने शिवसेनेचे ग्रामीण जिल्हाप्रमुख गणेश धात्रक यांना उमेदवारी मिळणार आहे आज याबाबत निर्णय येईल सर्वांचे लक्ष आता महविकास आघाडी च्या होणाऱ्या पत्रकार परिषदेकडे लागले आहे.


अजून बातम्या वाचा..

.