नांदगांव : माजी खासदार समीर भुजबळ यांनी नांदगाव विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी अर्ज दाखल केला आहे. समीर भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी प्रदेश अध्यक्ष आहेत.ते नाशिक मधून लोकसभेला संसदेवर निवडून गेले होते आणि त्यांचे चुलते छगन भुजबळ हे महाराष्ट्रातील प्रस्थापित नेते आहेत. भुजबळ कुटुंबाची नाशिक जिल्ह्यातील राजकारणात लक्षणीय पकड आहे.
समीर भुजबळ यांनी अर्ज दाखल केल्यानंतर कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला आणि नांदगाव मतदारसंघाच्या विकासाबाबत आपली बांधिलकी व्यक्त केली. त्यांनी आपल्या प्रचारात स्थानिक विकासकामे, पाणी, आरोग्य, शिक्षण आणि रोजगाराच्या मुद्द्यांवर भर देण्याची घोषणा केली आहे.
भुजबळ यांची अर्ज दाखल करण्याच्या कार्यक्रमात त्यांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भयमुक्त नांदगांव प्रगत नांदगांव या मुद्दयावर माजी खा.समिर भुजबळ यांची नांदगांव विधानसभेला अपक्ष नामांकन पञ दाखल समिर भुजबळ यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करीत भव्यरँलिच्या माध्यमातून भव्यसभेचे आयोजन करुन मतदाराना मार्गदर्शन करुन नंतर अर्ज दाखल केला यावेळी शहरातील सर्वच मुख्यमार्गावर नागरिकाची गर्दी झाली होती या प्रसंगी सकाळी ११ ते दुपार ३ वाजे पर्यंत नांदगांव शहरात रहदारीची समस्या निर्माण झाली होती पो नि प्रितम चौधरी यांनी लक्ष घालीत रहदारी सुरळीत केली. या वेळी जैनधर्मशाळा येथे सभेचे आयोजन कररून उपस्थित मतदाराना मार्ग दर्शन करण्यात आले यावेळी कळवाडी,निमगांव, साकोरा,बोलठाण, जातेगांव मनमाड नांदगांव, भालुर ,मांडवड, गट गणातील नागरीक उपस्थित होते यावेळी आरपीआय व विविध समनघटना यांनी पाठिबा, जाहिर केला.