“आपलं संविधान,आपला अभिमान”
संविधान हे कोणत्याही देशाच्या बांधणीचा पाया असतो.असंख्य भाषा,जाती,पंथ,धर्म,असणाऱ्या वैविध्यपूर्ण भारतासारख्या देशाला एकता, न्याय,समता आणि बंधुता या मूल्यांच्या आधारावर सर्वांना जोडणारे असे भारतीय संविधान आहे. त्यामुळे आपण ‘प्रथम भारतीय आणि अंतिमतः ही भारतीय आहोत’
२६ नोव्हेंबर १९४९ रोजी भारतीय संविधान समितीने संविधान स्वीकारले व २६ जानेवारी १९५० रोजी ते लागू करण्यात आले.
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी राष्ट्राला प्रदान केलेल्या भारतीय संविधानातील मौलिक तत्वे,मूलभूत अधिकार आणि कर्तव्ये स्वतंत्र भारताच्या नागरिकांना संस्कारित करणारी आहेत. संविधानातील मूलतत्त्वे शालेय विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबविणे आणि त्यांना जागरूक नागरिक बनविणे या करिता संविधानाची माहिती,त्यातील मुलतत्वांचा प्रसार व प्रचार होणे आवश्यक आहे.
संविधान दिना निमित्त जनजागृती तसेच संविधाना विषयी प्रचार, प्रसार हेतू शालेय दर्शनी फळ्यावर रंगीत खडू माध्यमातील फलक रेखाटनातून सर्व भारतीयांना संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
– फलक रेखाटन – देव हिरे.
(कलाशिक्षक, शिक्षण मंडळ भगूर, संचालित नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव. ता.चांदवड.जि.नाशिक.)
राशी भविष्य : १४ जानेवारी २०२५ – मंगळवार
मेष : आपल्या मतांविषयी आग्रही राहाल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. वृषभ : महत्त्वाची कामे...