मनमाड – आचार्य नागार्जुन विद्यापीठ गुंटूर आंध्रप्रदेश येथे २८ नोव्हेंबर ते ३ डिसेंबर २०२४ दरम्यान होणाऱ्या दक्षिण पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ वेटलिफ्टिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून
खुशाली निवृत्ती गांगुर्डे, करुणा रमेश गाढे यांची डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या संघात तर जयराज राजेश परदेशी याची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संघात निवड करण्यात आली आहे
यशस्वी खेळाडूंना छत्रे विद्यालयाचे क्रीडा प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे, आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक तृप्ती पाराशर यांचे मार्गदर्शन लाभले आहे
जय भवानी व्यायामशाळेचे अध्यक्ष डॉ विजय पाटील, मोहन अण्णा गायकवाड, डॉ सुनील बागरेचा, प्रा दत्ता शिंपी, छत्रे विद्यालयाचे अध्यक्ष पी जे दिंडोरकर,सचिव दिनेश धारवाडकर, संचालक नाना कुलकर्णी, प्रसाद पंचवाघ, मुख्याध्यापक आर एन थोरात, उपमुख्याध्यापक संदीप देशपांडे पर्यवेक्षिका सौ पोतदार, महाराष्ट्र वेटलिफ्टिंग संघटनेचे सचिव संतोष सिंहासने, अध्यक्ष सुधीर म्हाळसकर यांनी अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
राशी भविष्य : १४ जानेवारी २०२५ – मंगळवार
मेष : आपल्या मतांविषयी आग्रही राहाल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. वृषभ : महत्त्वाची कामे...