मनमाड शहरा जवळ असलेल्या अंकाई किल्ल्यावर नियमित ट्रेक करणाऱ्या मनमाड ट्रेकर्स च्या चार महिला तेरा पुरुषांनी तीन तासांच्या अवघड चढाईनंतर महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखरावर पाय ठेवला.मानसिक शारीरिक कस पाहणाऱ्या या शिखरावर मनमाडचे ट्रेकर्स 2005 पासून सातत्याने वर्षातून एकदा चढाई करत असून निसर्गाच्या अमर्याद सौंदर्याचा व गिरिभ्रमणाचा आनंद लुटत आहे
सदर मोहिमेत छत्र विद्यालयाचे क्रीडा प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे डॉक्टर भागवत दराडे सुनील पवार संदीप वनवे शशिकांत झाल्टे किरण भाबड प्रवीण मोरे शंकर अंजनवाड मुदस्सर शेख जय पवार आकाश मोरे नकुल मोरे कार्तिक सुरसे प्रतिभा अंजनवाड शाहिस्ता शेख शोभा झाल्टे वैशाली मोरे यांनी हा खडतर ट्रेक यशस्वीरित्या पूर्ण केला व शिखरावर विराजमान कळसुबाई मातेला वंदन केले

मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार
मनमाड - शहरात गेली 29 वर्ष कार्यरत असलेली व मनमाड शहराची अर्थ वाहिनी असलेल्या प्रगती अर्बन...