भाजपा मनमाड शहर दिव्यांग आघाडी च्या वतीने 33 व्या आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिना निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून भाजपा नाशिक जिल्हा उपाध्यक्ष नितीन पांडे, जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार फुलवाणी नारायण पवार भाजपा मनमाड शहर मंडल अध्यक्ष संदीप नरवडे जिल्हा चिटणीस एकनाथ बोडखे शिवसेना माजी नगरसेवक कैलास गवळी मनमाड शहर भाजपा डॉक्टर आघाडी चे डॉ. भूषण शर्मा शहर सरचिटणीस आनंद काकडे भाजपा भाजपा युवा मोर्चा शहर अध्यक्ष मुकुंद ऐळींजे भाजपा चे दिव्यांग आघाडी चे जिल्हा उपाध्यक्ष सप्तेश चौधरी, दिव्यांग आघाडी जिल्हा सरचिटणीस सुनीता वानखेडे दीपक पगारे दिव्यांग आघाडी शहर अध्यक्ष मनीष जैस्वाल आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते सर्व प्रथम मालेगाव व दिंडोरी लोकसभा मतदार संघांचे तीन वेळा भाजपा खासदार म्हणून लोकप्रतिनिधित्व केलेल्या दिवंगत खासदार स्व. हरिश्चंद्र चव्हाण यांना सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली त्यांनतर मनमाड शहर भाजपा तर्फे नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत नांदगाव विधानसभा मतदार संघातील भाजपा /शिवसेना /आर पी आय मित्र पक्ष महायुती चे विजयी उमेदवार आदरणीय आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या अभिनंदन चा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला भाजपा दिव्यांग आघाडी चे जिल्हा उपाध्यक्ष सप्तेश चौधरी यांनी दिव्यांग दिनाच्या संदर्भात माहिती देत कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले भाजपा महायुती चे देशातील आणि राज्यातील सरकार हे दिव्यांग बांधवान च्या सामाजिक आर्थिक आणि शैक्षणिक उन्नती साठी सदैव तत्पर आहे या दोन्ही सरकार नी दिव्यांग बांधवाना साठी मासिक पेन्शन,रेल्वे संदर्भात सवलती, आरोग्य योजना घरकुल योजना, शैक्षणिक योजना, प्रवास योजना या या सारख्या विविध लोक कल्याण कारी योजना आणल्या आहेत त्याचा लाभ सर्व दिव्यांगा घ्यावा असे सांगत भाजपा नाशिक जिल्हा उपाध्यक्ष नितीन पांडे यांनी विविध दिव्यांग ची योजना ची सविस्तर माहिती दिली भाजपा शहर सरचिटणीस आनंद काकडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले यावेळी मान्यवरांना हस्ते सर्व दिव्यांग बंधू भगिनींन चा शुभेच्छा सत्कार करण्यात आला तर भाजपा शहर उपाध्यक्ष गणेश कासार ,हिना बागवान,राकेश जाधव,असलम पठाण, सुनीता लोंढे चित्राताई चव्हाण या प्रमुख पदाधिकाऱ्यां सह दिव्यांग बांधवान त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते भाजपा मनमाड शहर अध्यक्ष संदीप नरवडे यांनी आभार प्रदर्शन केले कार्यक्रमाचे संयोजन भाजपा दिव्यांग आघाडी जिल्हा उपाध्यक्ष सप्तेश चौधरी, दिव्यांग आघाडी शहर अध्यक्ष मनीष जैस्वाल दीपक पगारे आदी नी केले