loader image

मराठी पत्रकार परिषद नाशिक विभागीय सचिव पदी अमोल खरे

Dec 21, 2024


मनमाड (प्रतिनिधी) : नांदगाव – मनमाड मराठी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष अमोल खरे यांची पत्रकारांची मातृ संघटना असलेली मराठी पत्रकार परिषद, मुंबईच्या नाशिक, अहिल्यानगर, धुळे, जळगाव, नंदुरबार जिल्ह्यांच्या नाशिक विभागीय सचिवपदी नियुक्ती परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख, विश्वस्त किरण नाईक यांनी जाहीर केली. निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

पत्रकारांची मातृसंस्था असलेली मराठी पत्रकार परिषदेच्या कोअर कमिटीच्या पुण्यात झालेल्या बैठकीत परिषदेच्या विभागीय सचिवांच्या नियुक्तयांवर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. विभागीय सचिवांच्या नियुक्त्या करताना तरूणांना प्राधान्य देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मुख्य विश्वस्त  एस. एम. देशमुख बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. विश्वस्त किरण नाईक, शरद पाबळे, कार्याध्यक्ष शिवराज काटकर, सरचिटणीस सुरेश नाईकवाडे, डिजिटल मिडिया परिषदेचे राज्याध्यक्ष अनिल वाघमारे, गणेश मोकाशी उपस्थित होते. यावेळी देशमुख आणि नाईक म्हणाले की परिषदेच्या संघटनात्मक रचनेत विभागीय सचिवांना विशेष महत्व आहे. पत्रकारांच्या समस्यांसह आपल्या विभागात संघटनेचं काम वाढविणयाबरोबरच विभागातील जिल्हे, तालुका पत्रकार संघांशी संपर्क आणि समन्वय ठेवण्याचे काम ही व्यवस्था करते. परिषदेच्या उपक्रमांची आपल्या विभागात अंमलबजावणी करण्याचे काम विभागीय सचिव पार पाडणार आहेत. विशेष म्हणजे विभागीय सचिव हे परिषदेचे कान व डोळे म्हणून कार्यरत असतात असे नाईक म्हणाले. परिषदेचे नवे विभागीय सचिव पुढील प्रमाणे नाशिक विभाग अमोल खरे (मनमाड), मुंबई विभाग दीपक कैतके (मुंबई फेरनियुक्ती) पुणे विभाग पी. पी. कुळकर्णी (सोलापूर), संभाजीनगर विभाग रवी उबाळे (बीड), नागपूर विभाग प्रदीप घुमडवार (नागपूर),
अमरावती विभाग शिखरचंद हुकूमचंद बागरेचा (वाशिम), कोकण विभाग मनोज खांबे (महाड), लातूर विभाग सचिन शिवशेट्टे (उदगीर फेरनियुक्ती), कोल्हापूर विभाग चंद्रकांत क्षीरसागर (सांगली) यांची नियुक्ती करण्यात आली. एस. एम. देशमुख, किरण नाईक यांनी सर्व नवनियुक्त विभागीय सचिवांचे अभिनंदन केलं आहे.


अजून बातम्या वाचा..

श्रावण मास अंगारक (मंगळी ) संकष्ट चतुर्थी निमित्त मंगळवार दिनांक 12/08/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात विशेष धार्मिक कार्यक्रमा चे आयोजन

श्रावण मास अंगारक (मंगळी ) संकष्ट चतुर्थी निमित्त मंगळवार दिनांक 12/08/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात विशेष धार्मिक कार्यक्रमा चे आयोजन

मनमाड - शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील...

read more
भारतीय जनता पार्टी मनमाड शहर प्रणित भाजप कामगार आघाडीच्या शहर शाखेच्या फलकाचे उदघाटन

भारतीय जनता पार्टी मनमाड शहर प्रणित भाजप कामगार आघाडीच्या शहर शाखेच्या फलकाचे उदघाटन

मनमाड - भारतीय जनता पार्टी देश स्तरावर विविध क्षेत्रामध्ये काम करीत असते कामगार क्षेत्रामध्ये...

read more
.