मनमाड: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे पुस्तक महोत्सव पुणे याचे औचित्य साधून विवेकानंद आश्रम संभाजीनगर व ग्रंथालय विभाग मनमाड महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अरुण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाच्या प्रांगणात पुस्तक प्रदर्शन ठेवण्यात आले. या अंतर्गत स्वामी विवेकानंदांची पुस्तके प्रदर्शनासाठी ठेवण्यात आली. मनमाड महाविद्यालयातील वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनाचा लाभ घेतला. यावेळी स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावरील वेगवेगळ्या प्रकारची पुस्तके यावेळी विद्यार्थ्यांनी खरेदी केली. या कार्यक्रमाप्रसंगी वरिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. बी.एस देसले, पर्यवेक्षक प्रा डी. व्ही सोनवणे, कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक श्री विठ्ठल फंड, ग्रंथालय विभाग प्रमुख डॉ आर. एस. लोखंडे, महाविद्यालयातील शिक्षक प्रशासकीय कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार
मनमाड - शहरात गेली 29 वर्ष कार्यरत असलेली व मनमाड शहराची अर्थ वाहिनी असलेल्या प्रगती अर्बन...