महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरूण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली रेणुका आजी भाऊसाहेब हिरे यांना११७ व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरूण पाटील यांनी आपल्या मनोगतातून आजींच्या आठवणींना उजाळा दिला. आजींना जरी शिक्षण घेता आले नाही तरी अनुभवाच्या शाळेने जगण्याचे तत्वज्ञान शिकविले. संसारातल्या कठीणतल्या कठीण प्रश्नांनी, प्रसंगांनी समाधान दिले. कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांच्या जीवन प्रवासात रेणुकाआजी हिरे यांनी कर्मवीरांच्या प्रत्येक कार्यात त्यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांना प्रेरित करण्याचे काम केले.याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. बी. एस. देसले, शैक्षणिक पर्यवेक्षक प्रा. डी बी. सोनवणे, कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक श्री विठ्ठल फंड सर्व प्रशासकीय पदाधिकारी, प्राध्यापक, सर्व विभाग प्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. पी व्ही अहिरे यांनी केले.

सेंट झेवियर हायस्कूलच्या शिक्षकांचे तालुकास्तरीय स्पर्धेत सुयश
मनमाड महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद...