कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर. मुख्याध्यापक दीपक व्यवहारे. उपप्राचार्य वैभव कुलकर्णी. विश्वस्त धनंजय निंभोरकर .यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेच पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन इयत्ता सहावी .इयत्ता पहिली यांनी केलेले होते. इयत्ता सहावीची दिव्या रायते .ईश्वरी पवार इयत्ता पहिलीचा साई मेहेत्रे. ज्ञानदा तोंडे .केजी विभागाचा देवेशा काजीकर या विद्यार्थ्यांनी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विषयी आपले मनोगत व्यक्त केले. “शिक्षणाच्या स्वर्गाचे जिने उघडले दार तीच सावित्री आज जगाची शिलेदार तीच सावित्री आज जगाची शिलेदार” सावित्रीबाई फुले यांच्या जीवनातील एक प्रसंग एकदा सावित्रीबाई फुले बाजारामध्ये गेल्या असताना त्यावेळी एक ख्रिश्चन गृहस्थाने त्यांना ख्रिश्चन चरित्र या नावाचे पुस्तक भेट म्हणून दिले होते सावित्रीबाई फुले यांनी ते पुस्तक हातामध्ये घेतले आणि पाहिलं तर त्यातल एक अक्षर सुद्धा त्यांना वाचता आला नव्हत आणि तेव्हापासून त्यांच्या मनामध्ये एक जिज्ञासा निर्माण झाली की काही का होईना पण हे पुस्तक संपूर्ण वाचून काढायचं आणि त्यासाठी आपण स्वतः साक्षर व्हायचं तेव्हापासून स्त्री शिक्षणाची ज्योत सावित्रीबाई फुले यांच्या मनामध्ये पेटली पुस्तक वाचण्याच्या जिज्ञासे पोटी सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाचे धडे ज्योतिराव फुले यांच्याकडून घ्यायला सुरुवात केली आणि सावित्रीबाई फुले सर्वप्रथम स्वतः शिक्षित झाल्या आणि सावित्रीबाई फुले यांनी ज्योतिबा फुले यांच्या मदतीने स्त्री शिक्षणाचेकार्य सुरू केले. सावित्रीबाई फुले घरोघरी जाऊन महिलांना मुलींना शिक्षणाचे धडे पटवून देत असत आणि 2 जानेवारी 1848 रोजी त्यांनी पुण्यातील बुधवार पेठे स्त्रीयासाठी पहिली शाळा काढली सावित्रीबाई फुले शिक्षणाचे कार्य सुरू असताना त्यांना लोकांनी मोठ्या प्रमाणे त्रास दिला.जसे अंगावरच दगड शेण फेकून मारले तरीही त्यांनी हार नाही मानली आणि आपले काम सुरू ठेवले “किती भोगीले किती सोसले तरी तिने शिकवले स्त्री शिक्षणाचे धडे तिच्या लेकींनी गिरवले” या विद्यार्थ्यांना कुमारी अमिता झाडे. सौ ज्योती खैरे. सौ क्षीरसागर. यांचे अनमोल असे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन किमया फाटक या विद्यार्थिनींनी केले.