loader image

रोहित शिंदे यांना पीएचडी पदवी प्रदान

Jan 9, 2025


मनमाड: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील रसायन शास्त्राचे प्राध्यापक रोहित शंकर शिंदे यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली. त्यांनी महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, लोकनेते व्यंकटराव हिरे पंचवटी महाविद्यालय येथील रसायनशास्त्र संशोधन केंद्रातील संशोधन मार्गदर्शक प्रो. डॉ. टि. बी. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली “डिझाईन सिंथेसिस अँड कॅरॅक्टरायझेशन ऑफ अनडोप्ड आणि डोप्ड नॅनोस्ट्रक्चर्स, देअर ॲप्लिकेशन्स इन डायडिग्रेडेशन, ऑरगॅनिक सिंथेसिस अँड अँटी मायक्रोबियल स्टडीज” या विषयावर प्रबंध सादर केला. त्यांच्या या उत्तुंग यशाबद्दल महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेचे जनरल सेक्रेटरी समाजश्री डॉ. प्रशांतदादा हिरे, संस्थेचे समन्वयक डॉ. अपूर्वभाऊ हिरे, संस्थेचे विश्वस्त युवानेते डॉ. अद्वयआबा हिरे व संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. हरीश आडके, प्राचार्य डॉ. बी. एस. जगदाळे, प्राचार्य डॉ. ए. व्ही. पाटील, प्राचार्य डॉ. एस. एन. निकम तसेच सर्व प्राध्यापक, कुलसचिव, शिक्षकेतर बंधू-भगिनी व विद्यार्थी यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. त्यांना प्रो. डॉ. बी. एस. देसले, डॉ. विष्णू आडोळे, डॉ. राहुल शिंदे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.


अजून बातम्या वाचा..

श्रावण मास अंगारक (मंगळी ) संकष्ट चतुर्थी निमित्त मंगळवार दिनांक 12/08/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात विशेष धार्मिक कार्यक्रमा चे आयोजन

श्रावण मास अंगारक (मंगळी ) संकष्ट चतुर्थी निमित्त मंगळवार दिनांक 12/08/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात विशेष धार्मिक कार्यक्रमा चे आयोजन

मनमाड - शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील...

read more
भारतीय जनता पार्टी मनमाड शहर प्रणित भाजप कामगार आघाडीच्या शहर शाखेच्या फलकाचे उदघाटन

भारतीय जनता पार्टी मनमाड शहर प्रणित भाजप कामगार आघाडीच्या शहर शाखेच्या फलकाचे उदघाटन

मनमाड - भारतीय जनता पार्टी देश स्तरावर विविध क्षेत्रामध्ये काम करीत असते कामगार क्षेत्रामध्ये...

read more
.