loader image
[ays_poll id=7]

मनमाड महाविद्यालयात ‘मराठी वाचन कट्टा’ सुरु व्यक्तिमत्त्व विकासासाठी विद्यार्थ्यांनी पुस्तकांशी मैत्री करणे आवश्यक आहे – प्राचार्य डॉ. अरुण पाटील

Jan 21, 2025

मनमाड (नाशिक) – महात्मा गांधी विद्यामंदिर संचालित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात ‘मराठी वाचन कट्ट्या’चे उद्घाटन करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण पाटील यांनी वरील विधान केले. ते पुढे असेही म्हणाले की, विद्यार्थ्यांनी शैक्षणिक अभ्यासक्रमाला अवांतर वाचनाची मजबूत जोड द्यायला हवी. याच उद्देशाने महाविद्यालयात ‘मराठी वाचन कट्टा’ सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना आपल्या आवडीची पुस्तके, मासिके व वर्तमानपत्रे वाचायला मिळणार आहे. पुस्तके माणसाला समृद्ध करतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी पुस्तकांशी मैत्री करणे आवश्यक आहे. महाविद्यालयातील ग्रीन जिममध्ये हा वाचन कट्टा सुरु करण्यात आला असून या अभिनव उपक्रमाचा विद्यार्थ्यांना नक्कीच फायदा होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
महाविद्यालयातील मराठी विभाग व संशोधन केंद्र आणि ग्रंथालय विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा संवर्धन पंधरवडा या उपक्रमाचे औचित्य साधत हा ‘मराठी वाचन कट्टा’ सुरु करण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात मराठी विभाग प्रमुख प्रा. (डॉ.) किरण पिंगळे यांनी वाचन कट्टा सुरु करण्यामागील भूमिका सांगितली. या उपक्रमांतर्गत साहित्य चर्चा, विचारांची देवाण-घेवाण, संवाद, समीक्षा, कथा कथन, कादंबरी वाचन, कविता वाचन आदि अनेक विषयांवर मंथन होणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी वाढण्यासाठी हा उपक्रम निश्चितच उपयोगी ठरणार आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपक्रम समन्वयक प्रा. सोमनाथ पावडे यांनी केले तर आभार ग्रंथपाल डॉ. आर. एस. लोखंडे यांनी मानले.
या प्रसंगी उपप्राचार्य प्रा. (डॉ.) बी. एस. देसले, शैक्षणिक पर्यवेक्षक प्रा. डी. व्ही. सोनवणे, कुलसचिव समाधान केदारे, सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी   रुपये 1,09,000/- किंमतीचे विक्रमी शिल्लक औषधं संकलन ➖️सेवा भारती (जनकल्याण समिती ) कडे सुपूर्द

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रुपये 1,09,000/- किंमतीचे विक्रमी शिल्लक औषधं संकलन ➖️सेवा भारती (जनकल्याण समिती ) कडे सुपूर्द

मनमाड - मनमाड शहरात धार्मिक, सांस्कृतिक, पर्यावरण ,सामाजिक व शैक्षणिक आरोग्य सेवा क्षेत्रात सन...

read more
शिवसेनेच्या तीव्र आंदोलनानंतर पिंपरखेड टोल नाका बंद; पगारवाढ आणि सुविधांसाठी एल्गार!

शिवसेनेच्या तीव्र आंदोलनानंतर पिंपरखेड टोल नाका बंद; पगारवाढ आणि सुविधांसाठी एल्गार!

​नांदगाव : प्रतिनिधी सुमितकुमार जगधने आमदार सुहास कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरखेड (ता....

read more
श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

मनमाड - मनमाड शहरात धार्मिक, सांस्कृतिक, पर्यावरण, सामाजिक व शैक्षणिक आरोग्य सेवा क्षेत्रात सन...

read more
मनमाड येथील कवि रबिंद्रनाथ टागोर एज्युकेशन सोसायटीचे २३ वर्ष पूर्ण करून २४ व्या वर्षात पदार्पण

मनमाड येथील कवि रबिंद्रनाथ टागोर एज्युकेशन सोसायटीचे २३ वर्ष पूर्ण करून २४ व्या वर्षात पदार्पण

मनमाड शहरातील अग्रगण्य अशा या शिक्षणसंस्थेचा २३ वा वर्धापन दिन कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल आणि...

read more
गुरुद्वारा मध्ये येणाऱ्या भाविकांनी पवित्र्य राखावे – मनमाड गुरुद्वारा प्रबंधक बाबा रणजित सिंहजी यांचे आवाहन

गुरुद्वारा मध्ये येणाऱ्या भाविकांनी पवित्र्य राखावे – मनमाड गुरुद्वारा प्रबंधक बाबा रणजित सिंहजी यांचे आवाहन

मनमाड : मनमाड शहरातील गुरुद्वारा हा आपल्या भारत देशातील शिख धार्मियांचा अत्यंत पवित्र आणि मुख्य...

read more
मनमाड साहित्य संघ आयोजित काव्यस्पर्धेची अंतिम फेरी व* पारितोषिक वितरण समारंभ येत्या २७  फेब्रुवारी रोजी.

मनमाड साहित्य संघ आयोजित काव्यस्पर्धेची अंतिम फेरी व* पारितोषिक वितरण समारंभ येत्या २७ फेब्रुवारी रोजी.

मराठी भाषा गौरव दिनानिमिताने कार्यक्रम मनमाड(प्रतिनिधी)- मनमाड साहित्य संघाने आयोजित केलेल्या...

read more
मनमाड : मनमाड नगरपरिषद आणि नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त येथील संत कैकाडी महाराज उद्यानात स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

मनमाड : मनमाड नगरपरिषद आणि नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त येथील संत कैकाडी महाराज उद्यानात स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

या उपक्रमात नगराध्यक्ष, नगरसेवक तसेच पत्रकारांनी हातात झाडू घेऊन उद्यानाची संपूर्ण स्वच्छता केली....

read more
नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघाला राज्यस्तरीय वसंतराव काणे आदर्श तालुका पुरस्कार मनमाड :

नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघाला राज्यस्तरीय वसंतराव काणे आदर्श तालुका पुरस्कार मनमाड :

अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने देण्यात येणारा प्रतिष्ठेचा “वसंतराव काणे आदर्श तालुका...

read more
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक अनिश्चित कालावधीसाठी प्रलंबित राहण्याची शक्यता

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक अनिश्चित कालावधीसाठी प्रलंबित राहण्याची शक्यता

राज्यातील 50 टक्के आरक्षण मर्यादा ओलंडलेल्या स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका घेण्यास सुप्रीम...

read more
मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये रयतेचे राजे शिवछत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली.

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये रयतेचे राजे शिवछत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली.

याप्रसंगी व्यासपीठावर शाळेचे मुख्याध्यापक फादर माल्कम नातो, उपमुख्याध्यापिका सिस्टर...

read more
.