loader image

नांदगाव मनमाड मराठी पत्रकार संघ व मनमाड शहर पोलीस स्टेशनतर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त गड किल्ले बांधणी स्पर्धा

Feb 9, 2025


मनमाड ता ८ : ‘चला मग किल्ला बनवूया, मातीशी नाते जोडू या’ हे ब्रीद वाक्य घेऊन आगामी शिवजयंती निमित्त नांदगांव मनमाड मराठी पत्रकार संघ आणि मनमाड शहर पोलीस स्टेशनच्या वतीने शालेय स्तरावर शिवरायांच्या गड किल्ल्यांच्या प्रतिकृतीचे मातीचे किल्ले बनविण्याची स्पर्धा रविवार १६ फेब्रुवारी रोजी आयोजित केली असून मनमाड शहरातील प्रत्येक शाळेने ५ ते ९ च्या विद्यार्थ्यांच्या तीन गटासाठी विनामूल्य स्पर्धेत उत्स्फूर्तपणे सहभाग घ्यावा असे आवाहन केले आहे.

येत्या १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी होत आहे. त्या निमित्ताने मनमाड शहरात शिवजयंतीनिमित्त गड किल्ले उभारणी स्पर्धेचे आयोजन नांदगाव मनमाड पत्रकार संघ आणि मनमाड शहर पोलीस स्टेशन यांच्यातर्फे आयोजित करण्यात आले आहे. ‘चला मग किल्ला बनवूया, मातीशी नाते जोडू या’ हे ब्रीद वाक्य घेऊन शिवजयंती निमित्त शिवरायांचे गड किल्ले मातीत बनविण्याची स्पर्धा घेण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्या कारकीर्दीत स्वराज्यासाठी महाराष्ट्रभर विविध जाती धर्मातील लोकांना सोबत घेऊन गड किल्ले उभारले, गड किल्ले जिंकले त्यांची माहिती येणाऱ्या पिढीला व्हावी या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा शालेय स्तरावर ठेवण्यात आली आहे. प्रत्येक शाळेतील ५ वी ते ९ वीच्या विद्यार्थ्यांचे तीन गटानुसार प्रवेशिका असणार आहे. शाळेने निवडलेल्या विद्यार्थ्यांच्या तीन गटाची प्रवेशिका दिनांक १३ तारखे पाठवायची आहे.

या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या ५ वी ते ९ वीच्या शालेय स्पर्धकांनी १३ फेब्रुवारी पर्यंत या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आपली प्रवेशिका त्यात आपले नाव, पत्ता, मोबाईल नंबर, शिवरायांचा कोणता किल्ला बनवणार, त्याचे नाव यासह इतर माहिती असलेली प्रवेशिका शाळेच्या मार्फत पत्रकार उपाली परदेशी, पत्रीसरकार कार्यालय, गुरुद्वारा समोर, मनमाड (9226727877), कलाशिक्षक मिलिंद वाघ सर (9270885350) यांच्याकडे पाठवायच्या आहेत. या स्पर्धेसाठी काही नियम अटी ठेवण्यात आल्या आहेत. रविवार दिनांक १६ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ ते ११ या दरम्यान ही स्पर्धा पोलीस परेड ग्राउंडवर होणार आहे. स्पर्धकांनी सकाळी ७ वाजताच हजर व्हायचे आहेत.
पर्यावरण पूरक गडकिल्ले मातीत बांधणे, छत्रपती शिवरायांच्या किल्ल्यांची प्रतिकृती सादर करावी,
प्रवेश विनामूल्य आहे. स्पर्धा संपल्यानंतर लगेचच परीक्षकांकडून परीक्षण करून निकाल जाहीर करून
यशस्वी प्रथम, द्वितीय, तृतीय आणि तीन उत्तेजनार्थ स्पर्धकांना आकर्षक सन्मानचिन्ह व रोख पारितोषिक, प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते दिले जातील अशी माहिती पोलीस निरीक्षक विजय करे, पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष अमोल खरे, तालुकाध्यक्ष संदीप जेजुरकर यांनी दिली.


अजून बातम्या वाचा..

भीमोत्सव समिती आयोजित प्रसिद्ध खंजिरी वादक मीरा उमप यांच्या गीतांची मैफल संपन्न

भीमोत्सव समिती आयोजित प्रसिद्ध खंजिरी वादक मीरा उमप यांच्या गीतांची मैफल संपन्न

मनमाड - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भीमोत्सव आयोजन समितीच्या वतीने आयोजित करण्यात...

read more
कवयित्री प्रतिभा खैरनार यांच्या ‘वंशावळीच्या प्राचीन सरीतून’ काव्यसंग्रहाचे पुण्यात प्रकाशन

कवयित्री प्रतिभा खैरनार यांच्या ‘वंशावळीच्या प्राचीन सरीतून’ काव्यसंग्रहाचे पुण्यात प्रकाशन

  नांदगाव: मारुती जगधने येथील प्रसिद्ध कवयित्री,कथा लेखिका यांच्या 'वंशावळीच्या प्राचीन...

read more
.