loader image

मनमाड महाविद्यालयात अभिरूप युवा संसद कार्यशाळा संपन्न

Feb 11, 2025


मनमाड : महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला विज्ञान युवानीचे महाविद्यालय मनमाड व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ विद्यार्थी विकास मंडळाच्या संयुक्त विद्यमाने अभिरूप युवा संसद कार्यशाळेचे मनमाड महाविद्यालयात आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. व्ही. पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांनी देशहीताच्या प्रश्नावर आपले मत व्यक्त केले पाहिजे तसेच देशाच्या सर्वोच्च संसदेची गरिमा जपली पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले. विद्यार्थ्यांना भारतीय संसदेचे कार्य कशा पद्धतीने चालते, संसदेचे सदस्य देशाच्या महत्त्वाच्या प्रश्नावर संसदेत कशा पद्धतीने चर्चा करतात, विरोधी पक्ष विविध प्रश्नांच्याद्वारे सत्ताधारी पक्षावर कशा पद्धतीने अंकुश ठेवतो या सर्वांचा विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव घेता यावा यासाठी अभिरूप युवा संसदेचे आयोजन करण्यात आले आहे असे त्यांनी स्पष्ट केले. या कार्यशाळेत मालेगाव येथील मसगा महाविद्यालयाचा संघ, मनमाड महाविद्यालयाचा संघ व मानूर महाविद्यालयाच्या संघाने सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी संसद सदस्य, कॅबिनेट मंत्री, पंतप्रधान, सभापती, विरोधी पक्ष सदस्य अशा विविध भूमिका निभावल्या. विरोधी पक्ष सदस्य बनलेल्या विद्यार्थ्यांनी जीएसटी चे वाढते दर, स्त्रियांवरील अत्याचार, देशातील बेरोजगारी, संकटात सापडलेली अर्थव्यवस्था इत्यादी विषयावर विविध प्रश्न विचारून सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. विरोधी पक्षनेता व गृहमंत्री यांच्यात झालेल्या देशातील वाढत्या गुन्हेगारी विषयक चर्चेने सभागृहातील वातावरणात तणाव वाढवला. सभापतीने चर्चेत हस्तक्षेप करत सभागृहात शांतता ठेवण्याची विनंती केली. अशाप्रकारे सहभागी झालेल्या संघांनी सभागृहामध्ये आपले सादरीकरण केले. उत्कृष्ट सादरीकरणासाठी मालेगावच्या महाराजा सयाजीराव गायकवाड महाविद्यालयाला प्रथम पारितोषिक देण्यात आले. तर द्वितीय पारितोषिक मनमाड महाविद्यालयाच्या संघाला देण्यात आले. सदर कार्यक्रम प्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. बी. एस. देसले, पर्यवेक्षक प्रा. डी. व्ही. सोनवणे, कुलसचिव समाधान केदारे, किमान कौशल्य विभागाचे उपप्राचार्य पी. के. बच्छाव, डॉ. राजाराम जाधव, डॉ. सुनील घुगे तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाविद्यालयाचे विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. विष्णू राठोड यांनी केले तर प्रस्ताविक राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा.शरद वाघ यांनी केले.


अजून बातम्या वाचा..

भीमोत्सव समिती आयोजित प्रसिद्ध खंजिरी वादक मीरा उमप यांच्या गीतांची मैफल संपन्न

भीमोत्सव समिती आयोजित प्रसिद्ध खंजिरी वादक मीरा उमप यांच्या गीतांची मैफल संपन्न

मनमाड - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भीमोत्सव आयोजन समितीच्या वतीने आयोजित करण्यात...

read more
कवयित्री प्रतिभा खैरनार यांच्या ‘वंशावळीच्या प्राचीन सरीतून’ काव्यसंग्रहाचे पुण्यात प्रकाशन

कवयित्री प्रतिभा खैरनार यांच्या ‘वंशावळीच्या प्राचीन सरीतून’ काव्यसंग्रहाचे पुण्यात प्रकाशन

  नांदगाव: मारुती जगधने येथील प्रसिद्ध कवयित्री,कथा लेखिका यांच्या 'वंशावळीच्या प्राचीन...

read more
.