loader image
[ays_poll id=7]

ढेकू येथील आश्रम शाळेतील दहावीच्या विद्यार्थ्यांचा आशिर्वाद तथा निरोप समारंभ उत्साहात साजरा

Feb 16, 2025

ढेकू ( प्रतिनिधी ) ग्रामोदय शिक्षण संस्था नाशिक संचालित माध्यमिक आश्रम शाळा ढेकू येथे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा आशीर्वाद तथा निरोप समारंभ उत्साहात पार पडला .
समारंभाच्या अध्यक्षस्थानी ग्रामोदय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष,विद्यमान नाशिक नगर पालिकेचे नगरसेवक श्री योगेशजी (मुन्नाशेठ)हिरे हे होते त्यांनी अध्यक्षीय भाषणात संस्थेचे ब्रीद ग्रामोदयात राष्ट्रहितम प्रवर्तते यांची उद्धिष्ट सफल होत असल्याचा आनंद व्यक्त केला.विद्यार्थ्यानी आदर्श नागरिक बनावे म्हणजेच आपोआप सुसंकृत समाज तयार होईल. शाळाचे ,गावाचे व संस्थेचे नाव उंचावण्याचे स्वप्न उराशी बाळगा असे आवाहन केले व आश्रम शाळेतील गुणवंत विद्यार्थांचे कौतुक केले. दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या. चांगले गुण मिळवून नाव लौकिक करा अश्या अपेक्षा त्यांनी व्यक्त केल्या तर कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रा. श्री सुरेश नारायणे यांनी परीक्षेला सामोरे जाताना मन प्रसन्न ठेवा. स्वतः चा,आत्मविश्वास ढासळू देऊ नका ,ध्येय प्रबळ असू द्या. सचिन तेंडुलकर ,इंदिरा गांधी, कुसुमाग्रज ,ऋतिक रोशन, यांसारखे परीक्षेत अयशस्वी झाले पण त्यांनी अंगी असलेल्या कला गुणांच्या आधारे ते जीवनात यशोशिखरावर पोहचल्या ची उदाहरणे देऊन विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले .
या प्रसंगी सर्वप्रथम संस्थेचे संस्थापक कै रामराव तथा पोपटराव हिरे व सरस्वती माता यांच्या प्रतिमांचेपूजन मान्यवरांचा हस्ते करण्यात आले.त्यानंतर शाळेतील इयत्ता ८वी रितेश पवार ९ वी हेमराज राठोड व १० मनोज राजाराम राठोड student of the Year २०२४ या पाच गुणवंत विद्यार्थ्यांचा ,आदर्श पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.तसेच
आंतरशालेय स्पर्धां मध्ये वैयक्तिक व सांघिक स्पर्धा विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले .शाळेतील करन राठोड ,अल्पेश राठोड ,मनोज राठोड आरेष राठोड नवनाथ चव्हाण कुमारी पायल राठोड ,अंजली राठोड ,कुमारी प्रतीक्षा चव्हाण या विद्यार्थ्यानी मनोगत व्यक्त केले .तर ८ व ९ विच्या विद्यार्थ्यांनी शुभेच्छा दिल्या .या प्रसंगी वाकला येथील प्रतिष्ठित व्यापारी श्री मनोज शेठ सोनी यांनी सर्व विद्यार्थ्यांना पेन, पेन्सिल पॅड भेट म्हणून दिले व मनोगतात शिक्षण निरंतर चालू ठेवा असे आव्हान केले .श्री विलास इंगळे अध्यक्ष श्रीमहालक्ष्मी माता बहु उद्देशीय संस्था कन्नड यांनी मनोगतातुन शिक्षणाचे महत्त्व पटवून सांगितले विद्यार्थी दशेतला आनंद पुन्हा येत नाही तो चिर:काल टिकतो असे उदाहरण देऊन त्यांनी आठवणींना उजाळा दिला. यावेळी प्रमुख पाहुण्यांनी१० वीच्या सर्व विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प व लेखणी देऊन शुभेच्छा दिल्या .कार्यक्रमाच्या शेवटी मुख्याध्यापक श्री जे एम थोरात यांनी मान्यवरांचे आभार मानले .श्री देवरे बी के यांनी व अधीक्षक श्री नितानकर एन इ यांनी सूत्रसंचालन केले .कार्यक्रमास सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद उपस्थित होते

अजून बातम्या वाचा..

मनमाड ता. २७  : महाराष्ट्राला लाभलेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांचा समृद्ध ऐतिहासिक ठेवा मोबाईलमध्ये गुंतलेल्या आजच्या तरुण पिढीच्या मनामनांत रुजावा यासाठी नांदगाव मनमाड मराठी पत्रकार संघ आणि मनमाड शहर पोलीस स्टेशनच्या वतीने आयोजित केलेला गड किल्ले बांधणीचा आदर्श उपक्रम हा समाजातील युवा पिढीशी मातीची बांधिलकी निर्माण करणारा आहे असे प्रतिपादन पोलीस निरीक्षक विजय करे यांनी येथे केले.

[contact-field...

read more
मनमाड शहर भाजपा मंडल च्या वतीने हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे 396 व्या जन्मोत्सव निमित्ताने अभिवादन कार्यक्रम संपन्न

मनमाड शहर भाजपा मंडल च्या वतीने हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे 396 व्या जन्मोत्सव निमित्ताने अभिवादन कार्यक्रम संपन्न

स्वराज्य चे संस्थापक महापराक्रमी जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचे 396 व्या जयंती निमित्ताने...

read more
पत्रकार विद्यापीठासाठी रस्त्यावर उतरावे लागले तरी सोबत राहू — किरण नाईक  मनमाडमध्ये पत्रकार गुणगौरव व जीवनगौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

पत्रकार विद्यापीठासाठी रस्त्यावर उतरावे लागले तरी सोबत राहू — किरण नाईक मनमाडमध्ये पत्रकार गुणगौरव व जीवनगौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

मनमाड (प्रतिनिधी) : पत्रकारांसाठी स्वतंत्र पत्रकार विद्यापीठ उभारण्यासाठी नाशिक येथे जागा उपलब्ध...

read more
छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त दुग्धाभिषेक सोहळा – नांदगावात उत्साहाचे वातावरण नांदगाव :सुमित कुमार जगधने

छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त दुग्धाभिषेक सोहळा – नांदगावात उत्साहाचे वातावरण नांदगाव :सुमित कुमार जगधने

  महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त नांदगाव येथे भव्य...

read more
मनमाड –स्टेम(सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजीनियरिंग, आणि गणित) मुंबईच्या वतीने  अंधेरी येथील होली फॅमिली हायस्कूलमध्ये विज्ञान व गणित तसेच इतर विषयाशी संबंधित शैक्षणिक विषयांवर आधारित आंतर शालेय स्पर्धेत येथील सेंट झेवियर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी नेत्र दीपक कामगिरी करून घवघवीत यश मिळवले‌

मनमाड --स्टेम(सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजीनियरिंग, आणि गणित) मुंबईच्या वतीने अंधेरी येथील होली फॅमिली...

read more
कवी रबिंद्रनाथ टागोर इंग्लिश स्कूल, मनमाडमध्ये शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी आर.टी.ई. अंतर्गत 25% राखीव व मोफत जागांसाठी प्रवेश प्रक्रियेबाबत

कवी रबिंद्रनाथ टागोर इंग्लिश स्कूल, मनमाडमध्ये शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी आर.टी.ई. अंतर्गत 25% राखीव व मोफत जागांसाठी प्रवेश प्रक्रियेबाबत

  शनिवार, दि.08 फेब्रुवारी 2026 रोजी कवी रबिंद्रनाथ टागोर इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये...

read more
मनमाड शहर भाजपा तर्फे पंडित दिनदयाळ उपाध्याय यांची 58 वी पुण्यतिथी समर्पण दिन म्हणून साजरी

मनमाड शहर भाजपा तर्फे पंडित दिनदयाळ उपाध्याय यांची 58 वी पुण्यतिथी समर्पण दिन म्हणून साजरी

  मनमाड शहर भाजपा च्या वतीने भारतीय जनसंघाचे संस्थापक व भाजपा च्या कार्यकर्त्यांन चे प्रेरणा...

read more
एच.ए.के. हायस्कूल अँन्ड ज्यु. कॉलेज मनमाड मध्ये इयत्ता 12 वी प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी / मार्च 2026 आसनव्यवस्था जाहीर.

एच.ए.के. हायस्कूल अँन्ड ज्यु. कॉलेज मनमाड मध्ये इयत्ता 12 वी प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी / मार्च 2026 आसनव्यवस्था जाहीर.

  मनमाड : इयत्ता 12 वी प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी / मार्च 2026 केंद्र क्रमांक 0236 एच.ए....

read more
.