*आमदार सुहास आण्णा कांदे व सौ. अंजुमताई कांदे यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. या नंतर सकाळी १० वाजता मिरवणुकीला सुरुवात झाली.
मिरवणुकीत भारतीय संस्कृतीला दर्शवणारे विविध देखावे तसेच मैदानी खेळ प्रात्यक्षिक दाखवण्यात आले, याव्यतिरिक्त महाकाल, हनुमान, महाकाली,तसेच कोळी नृत्य, पंजाबी नृत्य, अंबाबाई, गोंधळी, बाल भजनी मंडळ, चार घोड्यांचा भालदार चोपदार, घोड्यांच्या रथात विराजमान छत्रपती शिवाजी महाराज अशा विविध नटलेल्या पारंपारिक वेशभूषित असलेल्या कलाकारांच्या उपस्थितीने उत्सवाला रौनक आली. यासोबत नाशिक ढोल आणि डीजेच्या तालावर नाचणारे मावळे, फटाके फोडत आनंद साजरा करत होते, मनमाड शहरात अनेक ठिकाणी स्थानिक व्यापारी पाणी वाटप करतांना दिसून आले.
सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष सुनील जाधव व समितीचे सर्व पदाधिकारी, सदस्य आठ दिवसापासून नियोजन करत होते.
जयंती च्या दिवशी सकाळी शिवस्फूर्ती येथे विधिवत पूजा करत पुतळ्याच्या दुग्धाभिषेक करण्यात आला, यावेळी युवा सेना तालुकाप्रमुख सागर भाऊ हिरे पूजेला बसले होते.
सकाळी गावातून शेकडो शिवप्रेमींनी बाईक रॅली काढली.
सायंकाळी सहा वाजता आमदार सुहास अण्णा कांदे व सौ अंजुमताई कांदे यांच्या उपस्थितीत शिवस्फूर्ती मैदान येथून मिरवणुकीला सुरुवात झाली, फुले चौक गांधी चौक आंबेडकर चौक हुतात्मा चौक अहिल्यादेवी होळकर स्मारक जैन धर्मशाळा मार्गे मिरवणूक शिवसृष्टी अहिंसा चौक मालेगाव रोड येथे पोहोचली, त्यावेळी हजारोंच्या संख्येने शिवप्रेमी उपस्थित होते, यामध्ये युवा तरुण-तरुणी वृद्ध तसेच लहान बालगोपाल मिरवणुकीत सहभागी होते.
अनेक लहान व युवांनी छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज मासाहेब जिजाऊ यांची वेशभूषा धारण केली होती.
यावेळी युवा सेना जिल्हाप्रमुख फरान दादा खान यांनी आलेल्या सर्व शिवप्रेमींचे समितीच्या वतीने स्वागत केले.
आमदार सुहास अण्णा कांदे व सौ. अंजुमताई कांदे यांनी यावेळी महाआरतीचा लाभ घेतला. याप्रसंगी शिवसृष्टीचा परिसर शिवप्रेमी तुडूंब भरलेला होता.
आरती संपताच शिवसृष्टीच्या चौफेर फटाक्यांची तुफान आतिषबाजी करण्यात आली.
सबंध महाराष्ट्रातील शिवप्रेमींचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मदिवस अतिशय आनंददायी उत्साही वातावरणात साजरे केल्याचा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर पाहायला मिळाला.











