loader image
[ays_poll id=7]

विवेकी समाजमन घडविण्याची क्षमता शिक्षकांमध्ये अधिक-डॉ.गोराणे.

Feb 25, 2025

नांदगाव ( प्रतिनिधी )आज समाजात अनेक धर्मातील धार्मिकतेच्या नावाखाली साजऱ्या होणाऱ्या सण-समारंभ, उत्सवाला जाणीवपूर्वक ऊन्मादी अवस्थेकडे नेण्याचा प्रयत्न होताना दिसतो.
त्यामुळे समाजात निखळ आनंद, मनोरंजन, सार्थकता, कृतज्ञता, समाधान अशा भावना निर्माण होण्याऐवजी भीती, अफवा, अंधश्रद्धा, अस्वस्थता, पर्यावरणाचा नाश अशा विनाशकारी गोष्टी घडताना दिसतात.हे अरिष्ट थांबवण्याची ताकद विवेकात असते आणि विवेकी समाजमन घडवण्याची क्षमता शिक्षकांमध्ये अधिक असते, असे प्रतिपादन महाराष्ट्र अंनिसचे राज्य प्रधान सचिव डॉ. ठकसेन गोराणे यांनी केले.
नांदगाव येथील शिक्षक प्रशिक्षण कार्यशाळेमध्ये डॉ. गोराणे बोलत होते.ते पुढे म्हणाले की, जेव्हा समाजात कालबाह्य, निरर्थक कर्मकांडांना महत्व दिले जाते, त्यामुळे समाजात दैववादीपणा व अंधश्रद्धा वाढीस लागतात आणि प्रयत्नवाद खिळखिळा होतो.
दैववादीपणा, अंधश्रद्धा यांनाआळा घालण्यासाठी शिक्षण प्रक्रियेतून वैज्ञानिक दृष्टिकोन जाणीवपूर्वक विकसित करणे आवश्यक असते. वैज्ञानिक दृष्टिकोनाला मूल्यांची जोड दिली की माणसाच्या मनात विवेकाची निर्मिती होते. मग व्यक्ती व समाजाच्या हातून विवेकी वर्तन घडते.
मात्र त्यासाठी शिक्षकांनी स्वतःचे निरीक्षण, तर्क, अनुमान ,प्रचिती, प्रयोग या शास्त्रीय विचारपद्धती बरोबरच स्वतः चे वाचन, लेखन, चिंतन, मनन वाढवले पाहिजे.
या प्रशिक्षण कार्यशाळेत वैज्ञानिक दृष्टिकोनाचा आशय स्पष्ट करण्यासाठी रिकाम्या तांब्यातून पुन्हा पुन्हा पाणी काढणे ,अंधश्रद्धेची बेडी सोडवणे ,स्पर्श भ्रम, दृष्टी भ्रम कसे होतात ते प्रयोगातून दाखविले.
अशा विविध चमत्कार प्रात्यक्षिकांचे सादरीकरण करून,
त्यामागील शास्त्रीय कार्यकारणमीमांसा त्यांनी स्पष्ट केली .चमत्कार कधीच घडत नसतात. त्यामागे हातचलाखी ,सराव, विज्ञानाच्या नियमांचा वापर ,रासायनिक पदार्थांचा बेमालूम वापर अशा प्रमुख गोष्टींचा वापर केलेला असतो.प्रशिक्षणार्थींकडून चमत्कार प्रात्यक्षिकांचा सराव करून घेण्यात आला.
त्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले. यावेळी त्यांच्यासोबत नांदगाव अंनिस शाखेचे अध्यक्ष प्रा. सुरेश नारायणे, पिंपरखेड शाखेचे अध्यक्ष संजय कांदळकर होते.

अजून बातम्या वाचा..

वीज वितरण कंपनीने दुष्काळी परिस्थितीत तालुक्यातील जनतेला सहकार्य करावे – शिवसेना ठाकरे गटाची मागणी

वीज वितरण कंपनीने दुष्काळी परिस्थितीत तालुक्यातील जनतेला सहकार्य करावे – शिवसेना ठाकरे गटाची मागणी

मनमाड - नांदगाव मतदार संघ व मनमाड शहर व ग्रामिण भागात दुष्काळी परिस्थती असल्यामुळे सर्वत्र शेतकरी...

read more
बघा व्हिडिओ : नांदगाव मनमाड सह ग्रामीण भागात गारपिटीने पिकांची हानी: भीषण पाणी टंचाईने होरपळणाऱ्या तालुका वासीयाना अस्मानी तडाखा

बघा व्हिडिओ : नांदगाव मनमाड सह ग्रामीण भागात गारपिटीने पिकांची हानी: भीषण पाणी टंचाईने होरपळणाऱ्या तालुका वासीयाना अस्मानी तडाखा

नांदगाव : मारुती जगधने तालुक्यात भीषण पाणी टंचाई निर्माण झाल्याने नागरीक जोरदार पावसाची अपेक्षा...

read more
माघ मास संकष्ट चतुर्थी निमित्त बुधवार दिनांक 28/02/2024 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

माघ मास संकष्ट चतुर्थी निमित्त बुधवार दिनांक 28/02/2024 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड - मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या...

read more
भारतीय रेल्वे 554 स्टेशनच्या अमृत भारत रेल्वे स्टेशन विकास योजने मध्ये मध्य रेल्वे भुसावळ मंडलातील रापली अंडरपास निर्माण विकास कामाचे  पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीने द्वारे शुभारंभ व लोकार्पण  कार्यक्रम संपन्न

अमृत भारत रेल्वे स्टेशन अंतर्गत संपूर्ण देशात भारतीय रेल्वे द्वारे 554 रेल्वे स्टेशनचा पुनर्विकास...

read more
.