loader image

नांदगाव येथे फुले दांपत्ये स्मारकाचे उभारणीस मंजुरी

Feb 28, 2025


 

नांदगाव. मारुती जगधने
आमदार सुहास अण्णा कांदे यांनी नांदगाव शहरात महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्यांचे स्मारक उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या उपक्रमाची घोषणा त्यांनी 24 फेब्रुवारी 2025 रोजी आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर केली. या स्मारकाच्या माध्यमातून फुले दांपत्याच्या कार्याचा सन्मान करण्यात येणार आहे.

या निर्णयामुळे नांदगाव शहरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे, आणि या स्मारकामुळे फुले दांपत्याच्या शिक्षण आणि सामाजिक सुधारणा क्षेत्रातील योगदानाची आठवण कायम राहील.
दरम्यान आमदार सुहास अण्णा कांदे यांनी फुले स्मारकाच्या घोषणेनंतर नांदगाव येथे संत सावता महाराज कंपाऊड मध्ये समाज बांधवांची बैठक घेण्यात आली दिनांक 27 रोजी घेतलेल्या बैठकीमध्ये संत सावता महाराज कंपाऊड येथे आमदार सुहास अण्णा कांदे यांनी केलेल्या घोषणाचे सर्व समाज बांधवांच्या वतीने
अभिनंदनचा ठराव करण्यात आला या संदर्भात लवकरच फुले स्मारक नांदगाव शहरात उभारले जाहणार असल्याने सर्व नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. फुले दांपत्य स्मारकासाठी आमदार सुहास अण्णा कांदे यांनी स्वखर्चाने 50 लाख रुपयांची देणगी जाहीर केली आहे .त्यांच्या या निर्णयाचे सर्व थरातून स्वागत होत आहे. आमदार सुहास अण्णा कांदे यांनी फुले स्मारकाच्या संदर्भात घेतलेल्या निर्णयाचे स्वागत तर होतच आहे परंतु आमदार सुहास अण्णा कांदे यांनी स्वतःहून अगोदर निर्णय घेतला आणि नंतर समाजबांधवांना या निर्णयाची गोड माहिती दिली त्यामुळे सर्व समाज बांधवांनी मोठा आनंद व्यक्त केला. आता लवकरच नांदगाव शहर मध्ये फुले दांपत्याचे स्मारक उभे राहणार आहे याचे चित्र नागरिकांच्या डोळ्यासमोर उभे राहत आहे.

दिनांक 27 फेब्रुवारी रोजी संत सावता महाराज कंपाउंड मध्ये झालेल्या बैठकीमध्ये शेकडो समाज बांधव उपस्थित होते.
: महात्मा फुले दांपत्ये स्मारक उभारणी संदर्भात आमदार सुहास अण्णा कांदे यांनी धुळे येथील मूर्तिकार सरमत पाटील यांच्याशी संपर्क करून त्यांना वीस लाख रुपये ऍडव्हान्स देण्यात आलेला आहे सदर मूर्तिकाराने नांदगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज अहिल्यादेवी होळकर या थोर पुरुषांचे मूर्तीचे काम केलेले आहे. मूर्तिकार पाटील यांना वीस लाख रुपये ऍडव्हान्स देताना आमदार सुहास अण्णा कांदे, अंजुमताई कांदे व समाज बांधव इत्यादी


अजून बातम्या वाचा..

भीमोत्सव समिती आयोजित प्रसिद्ध खंजिरी वादक मीरा उमप यांच्या गीतांची मैफल संपन्न

भीमोत्सव समिती आयोजित प्रसिद्ध खंजिरी वादक मीरा उमप यांच्या गीतांची मैफल संपन्न

मनमाड - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भीमोत्सव आयोजन समितीच्या वतीने आयोजित करण्यात...

read more
कवयित्री प्रतिभा खैरनार यांच्या ‘वंशावळीच्या प्राचीन सरीतून’ काव्यसंग्रहाचे पुण्यात प्रकाशन

कवयित्री प्रतिभा खैरनार यांच्या ‘वंशावळीच्या प्राचीन सरीतून’ काव्यसंग्रहाचे पुण्यात प्रकाशन

  नांदगाव: मारुती जगधने येथील प्रसिद्ध कवयित्री,कथा लेखिका यांच्या 'वंशावळीच्या प्राचीन...

read more
.