loader image
[ays_poll id=7]

भुमी क्रिकेट अकॅडमीतील भाविका कौरानी व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशनच्या वरिष्ठ महिला संघात निवड

Mar 2, 2025

मनमाड –
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ ( BCCI ) अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी ( जिल्हास्तरीय सामने ) नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन वरिष्ठ महिला संघाची निवड चाचणी नुकतीच पार पाडण्यात आली.
या चाचणीमध्ये मनमाड मधील भुमी क्रिकेट अकॅडमीतील खेळाडु भाविका कौरानी व सुहानी बोरा यांनी नंदुरबार जिल्हा संघाच्या खेळाडुंच्या यादित आपली जागा बनवण्यात यश मिळवले.

महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत हे सामने पुणे येथे मार्च महिन्यात खेळवले जाणार असुन या महिला खेळाडु हे जिल्हास्तरीय सामने खेळतील. मनमाडच्या ह्या नवोदित खेळाडु महाराष्ट्र संघात निवड होण्यासाठी आपल्या खेळाचे प्रदर्शन उच्चस्तरीय स्पर्धेत करणार आहेत.

मनमाडच्या या महाला खेळाडुंकडुन चांगली कामगीरि होऊन त्यांची वरिष्ठ महिला महाराष्ट्र राज्य संघात निवड व्हावी अशी शुभेच्छा सर्वाकडुन या खेळाडुंना दिली जात आहे. मनमाड शहराचे नंदुरबार जिल्ह्यासंघात प्रतिनिधित्व करण्यासाठी या खेळाडु भुमी क्रिकेट अकॅडमी मनमाड येथे सराव करत आहे.

नंदुरबार जिल्हा क्रिकेट असोसिएशन चे सचिव श्री. युवराज पाटिल सर व मनमाड गुरुद्वारा येथील जथेदार बाबा रणजित सिंग जी यांचे विशेष सहकार्य या खेळाडुंना लाभले तसेच श्री. गुरुगोबिंद सिंग हायस्कूल मनमाडचे प्रशासक श्री. सुखदेव सिंग जी सर यांचे ही विशेष सहकार्य लाभले.

या निवडीसाठी नांदगाव मतदार संघाचे आमदार श्री. सुहास आण्णा कांदेजी , फरहान दादा खान , ईरफान भाई मोमीन , राजाभाऊ पगारे , गणेश धात्रक, श्रेणिक बरडिया , तय्यबभाई शेख, सिध्दार्थ बरडिया , कौशल शर्मा , परवेज शेख , सनी फसाटे , मनोज ठोंबरे सर , दक्ष पाटिल, चिराग निफाडकर , रोहीत पवार तसेच संचालक वाल्मीक रोकडे यांनी खेळाडुंचे अभिनंदन करुन पुढिल सामन्यांसाठी शुभेच्छा दिल्या.

या खेळाडुंचे प्रशिक्षक सिध्दार्थ ( भोला ) रोकडे सरांचे मार्गदर्शन या सर्वांना लाभले. या सर्व खेळाडुंना पुढिल सामन्यांसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

अजून बातम्या वाचा..

मनमाड महाविद्यालयातर्फे ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रमांतर्गत वागदर्डी धरण परिसरात प्लास्टिक मुक्त अभियान’

मनमाड महाविद्यालयातर्फे ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रमांतर्गत वागदर्डी धरण परिसरात प्लास्टिक मुक्त अभियान’

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड यांच्या राष्ट्रीय सेवा...

read more
मनमाड चे आराध्य दैवत श्री निलमणी गणेशाच्या पार्थिव मूर्तीची ढोल ताशा च्या गजरात पालखी तून विसर्जन महामिरवणुक संपन्न

मनमाड चे आराध्य दैवत श्री निलमणी गणेशाच्या पार्थिव मूर्तीची ढोल ताशा च्या गजरात पालखी तून विसर्जन महामिरवणुक संपन्न

मनमाड - मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणारा व गणेश उत्सवा तील प्रथम मानाचा गणपती म्हणून...

read more
श्री गुरुगोविंद सिंग हायस्कूल मनमाड चे शालेय शासकीय शिकाई (मार्शल आर्ट ) , जीत -कुणे -दो व थांग-था मार्शल आर्ट स्पर्धेत घवघवीत यश…

श्री गुरुगोविंद सिंग हायस्कूल मनमाड चे शालेय शासकीय शिकाई (मार्शल आर्ट ) , जीत -कुणे -दो व थांग-था मार्शल आर्ट स्पर्धेत घवघवीत यश…

  नाशिक येथे मीनाताई ठाकरे स्टेडियम येथे झालेल्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र...

read more
बघा व्हिडिओ : पाण्याखाली श्रीगणेशाची प्रतिमा रांगोळी ने साकारत बाप्पाचे अनोखे विसर्जन…!

बघा व्हिडिओ : पाण्याखाली श्रीगणेशाची प्रतिमा रांगोळी ने साकारत बाप्पाचे अनोखे विसर्जन…!

या गणेशोत्सवात लाडक्या श्रीगणेशाच्या आगमनाने दहा दिवस सर्वत्र प्रसन्नमय वातावरण झाले. बाप्पाच्या...

read more
बघा व्हिडिओ-भाद्रपद महागणेशोत्सव 2024 निमित्त वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग 10 वर्षी

बघा व्हिडिओ-भाद्रपद महागणेशोत्सव 2024 निमित्त वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग 10 वर्षी

छप्पन महाभोग (महानैवेद्य) कार्यक्रमाचे आयोजन संपन्न गणेश भक्तांचा उदंड प्रतिसाद मनमाड - आम्ही...

read more
.