loader image

जाविद मुश्ताक शेख सर यांनी दाखविलेल्या प्रामाणिक पणाबद्दल कौतुक

May 2, 2025


 

मनमाड :- छत्रपती शिवाजी महाराज चौक,मनमाड येथील एच.डी.एफ.सी.बँकचे ए. टी.एम. मधून अचानक बाहेर आलेले दुसऱ्या खातेदाराचे ९७ हजार रुपये मनमाड क्रिकेट असोसिएशन चे सचिव व एच.ए.के. हायस्कूल &ज्यु. कॉलेज चे कर्मचारी तथा प्रसिद्धी प्रमुख जावेद मुश्ताक शेख सर यांनी मूळ मालक श्री. रमेश गांधी यांना प्रामाणिकपणे परत दिल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.त्यांच्या माणुसकी चे कौतुक होत आहे.माणुसकी टिकून आहे. याची प्रचिती देणारे उदाहरण जावेद शेख यांनी दाखवून दिले. छत्रपती शिवाजी चौक, मनमाड येथे एच डी एफ सी च्या ए.टी.एम. मध्ये पैसे काढायला गेले होते .त्यांनी ए.टी.एम. मध्ये आपला कार्ड टाकताच अचानक बँक प्रोसेस होण्या आधी ए.टी.एम.मधून 97 हजार रुपये बाहेर आले .हे पाहून जावेद सरांना आश्चर्य वाटले.त्यांनी लगेच त्यांचे मित्र फुले, शाहू, आंबेडकर मंचचे कार्याध्यक्ष तथा समन्वयक नाशिक जिल्हा संभाजी ब्रिगेडचे समन्वयक फिरोज शेख यांना या बाबत माहिती दिली. फिरोज शेख यांनी जावेद शेख यांच्या सोबत ए.टी.एम मध्ये आधी येऊन गेलेल्या खातेदारांचा शोध घेतला .तेव्हा ही रक्कम व्यापारी रमेश गांधी यांची असल्याचे लक्षात आले. फिरोज शेख यांनी गांधींना कॉल करुन जावेद शेख यांच्याकडे पाठवून 97 हजार रुपये त्यांना परत केले .याबद्दल रमेश गांधी यांनी जावेद शेख सर यांचे आभार मानून कौतुक केले. जावेद शेख सरांनी दाखविल्याबद्दल जावेद शेख सरांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. जाविद शेख हे फुले,शाहू,आंबेडकर मुस्लिम विचार मंचचे मार्गदर्शक शेख मुश्ताक सर यांचे चिरंजीव आहे.


अजून बातम्या वाचा..

मनमाड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड परीक्षेत यश, प्राचार्यांनी केला सत्कार.

मनमाड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड परीक्षेत यश, प्राचार्यांनी केला सत्कार.

मनमाड – महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य स्वायत्त महाविद्यालय, मनमाड येथील...

read more
श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

मनमाड - शहरात गेल्या 1997 पासून सलग 29 वर्ष आम्ही परंपरा पाळतो..!! आम्ही संस्कृती चे रक्षण करतो हे...

read more
.