loader image

जिल्हास्तरीय क्रिकेट सामण्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकर शतकवीर तर मयंक भालेरावची अर्धशतकीय खेळी

May 4, 2025


 

गुरुवार 01 मे 25 रोजी BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या अंडर 16 ( जिल्हास्तरीय ) स्पर्धा महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात खेळवल्या जात आहे. या क्रिकेट स्पर्धेत मनमाडमधील भुमी क्रिकेट अकॅडमीतील खेळाडु नंदुरबार जिल्हा तसेच नाॅर्थ झोन महाराष्ट्र संघातर्फे खेळत आहे.

2 दिवसाच्या या कसोटी सामण्यात मनमाडमधील खुशाल परळकर याने हिंगोली अंडर 16 विरुध्द खेळताना सामण्याच्या पहिल्या डावात 125 चेंडूंमध्ये 1 षटकार तसेच 18 चौकारांसह ताबडतोब 110 धावा फटकवल्या तसेच मयंक भालेराव याने डिवीसीए पुणे अंडर 16 विरुध्द खेळताना सामण्याच्या पहिल्या डावात 115 चेंडूंमध्ये 8 चौकारांसह 53 धावा फटकवल्या.

महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत जिल्हास्तरीय सामण्यात खुशालचे हे पहिले शतक व आतापर्यंतचा त्यांचे हे वैयक्तिक सर्वोत्तम प्रदर्शन ठरले तसेच मयंकचे हे दुसरे अर्धशतक ठरले.
हे दोघही खेळाडु भुमी क्रिकेट अकॅडमीत सराव करत असुन सध्या मनमाडचे नेतृत्व विवध संघात करित आहे.

नंदुरबार जिल्हा क्रिकेट असोसिएशन चे सचिव श्री. युवराज पाटिल सर व मनमाड गुरुद्वारा येथील जथेदार बाबा रणजित सिंग जी यांचे विशेष सहकार्य या खेळाडुंना लाभले तसेच श्री. गुरुगोबिंद सिंग हायस्कूल मनमाडचे प्रशासक श्री. सुखदेव सिंग जी सर यांचे ही विशेष सहकार्य लाभले.

या कामगीरिसाठी नांदगाव मतदार संघाचे आमदार श्री. सुहास आण्णा कांदेजी व भुमी क्रिकेट अकॅडमीचे आधारस्तंभ ईरफान भाई मोमीन , राजाभाऊ पगारे , गणेश धात्रक, श्रेणिक बरडिया , तय्यबभाई शेख, सिध्दार्थ बरडिया , कौशल शर्मा , परवेज शेख , सनी फसाटे , सनी पाटिल, मनोज ठोंबरे सर , दक्ष पाटिल , रोहीत पवार तसेच संचालक वाल्मीक रोकडे यांनी खेळाडुंचे अभिनंदन करुन पुढिल सामन्यांसाठी शुभेच्छा दिल्या.

या खेळडुला प्रशिक्षक सिध्दार्थ ( भोला ) रोकडे सरांचे मार्गदर्शन लाभले.


अजून बातम्या वाचा..

सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

मनमाड- महाराष्ट्र बास्केटबॉल असोसिएशन यांच्या मान्यतेने तसेच नाशिक डिस्ट्रिक्ट बास्केटबॉल असोसिएशन...

read more
नांदगाव तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत सेंट झेवियर हायस्कूलच्या खेळाडूंचे घवघवीत यश

नांदगाव तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत सेंट झेवियर हायस्कूलच्या खेळाडूंचे घवघवीत यश

मनमाड:-क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक, व...

read more
आयशा गाजियानी मॅडम यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल एच.ए. के. हायस्कूल ज्यु.कॉलेज तर्फे सत्कार.

आयशा गाजियानी मॅडम यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल एच.ए. के. हायस्कूल ज्यु.कॉलेज तर्फे सत्कार.

  मनमाड :- रोटरी क्लब ऑफ मनमाड तर्फे एच.ए. के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड च्या...

read more
.