मनमाड – शहरात चाललेला वीज वितरण कंपनीचा भोंगळा कारभार चोवीस चोवीस तास वीज पुरवठा बंद त्यात घरगुती वीज ग्राहक असेल किंवा व्यावसायिक दुकानदार असेल वीज पुरवठा असा कायम खंडित होत असल्याने सर्वच छोट्या मोठ्या घटकांवर याचा गंभीर परिणाम होतोय त्यात वीज ग्राहकांसाठी आपली तक्रार नोंदविण्यासाठी असलेला वीज वितरण कंपनी मनमाड येथील दूरध्वनी क्रमांक ०२५९१,२२२३८४ हा कायम बंद असतो किंवा लागत नाही याची वारंवार वीज ग्राहकांनी तक्रार करून सुद्धा यात कुठलीही सुधारणा झालेली नाही त्यामुळे आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकारी यांनी वीज वितरण कंपनी मनमाड येथे जाऊन येथील अधिकारी व कर्मचारी यांना जाब विचारत या विषयाचे गांभीर्य लक्षात आणून दिले तसेच तेथील असलेला टेलिफोन याला पुष्पहार घालून अगरबत्ती लाऊन शांततेच्या मार्गाने निषेध व्यक्त केला, तसेच यापुढे
येत्या दोन दिवसात जर आपला दूरध्वनी क्रमांक सुरळीत चालू झाला नाही आणि वीज ग्राहकांची तक्रार योग्य प्रकारे सोडविण्यात आली नाही तर तिसऱ्या दिवशीच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने योग्य प्रकारे याची दखल घेतली जाईल यास सर्वस्वी वीज वितरण कंपनीचे अधिकारी व कर्मचारी जबाबदार असतील असे निवेदन वीज वितरण अधिकारी यांना शिवसेना तालुका सचिव शैलेश प्रकाश सोनवणे व पदाधिकारी यांच्या वतीने देण्यात आले देण्यात आले
त्यावेळी
शहरप्रमुख माधव शेलार
जेष्ठ शिवसैनिक रमेश अण्णा हिरण
तालुका सचिव शैलेश प्रकाश सोनवणे
शहर संघटक रवी इप्पर
जेष्ठ शिवसैनिक राजाभाऊ आहेर
शहर सचिव न्यानेश्वर नागपुरे
व शिवसैनिक उपस्थित होते
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष कायम वीज ग्राहकांच्या पाठीशी आहे