राजगिर बिहार येथे सुरू असलेल्या ७ व्या खेलो इंडिया यूथ गेम्स या राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत आंतरराष्ट्रीय खेळाडू आकांक्षा किशोर व्यवहारे हिने उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले खेलो इंडिया यूथ गेम्स मधील हे दुसरे सुवर्णपदक आहे आकांक्षा सध्या भारतीय क्रीडा प्राधिकरण छत्रपती संभाजी नगर येथे सराव करत आहे मागील वर्षी चेन्नई येथे झालेल्या खेलो इंडिया यूथ गेम्स मध्ये दुखापतीमुळे चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते पण या वर्षी दुखापती वर मात करून आकांक्षाने जिद्दीने पुन्हा एकदा सुवर्णपदक जिंकले आहे
आकांक्षा ला छत्रे विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रवीण व्यवहारे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक तृप्ती पाराशर विजय रोहिला यांचे मार्गदर्शन लाभले आहे
जय भवानी व्यायामशाळेचे अध्यक्ष डॉ विजय पाटील मोहन अण्णा गायकवाड डॉ सुनील बागरेचा प्रा दत्ता शिंपी छत्रे विद्यालयाचे अध्यक्ष पी जे दिंडोरकर सचिव दिनेश धारवाडकर संचालक नाना कुलकर्णी बी एस कुलकर्णी प्रसाद पंचवाघ उपमुख्याध्यापक संदीप देशपांडे पर्यवेक्षिका सौ पोतदार एस एस महाराष्ट्र वेटलिफ्टिंग संघटनेचे सचिव संतोष सिंहासने अध्यक्ष सुधीर म्हाळसकर यांनी अभिनंदन केले